आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Birthday Special: Angelina Jolie Turns 40, Started Her Career At The Age Of 16

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

B'Day: 16 वर्षी सुरु केले होते करिअर, आज आहे 1283 कोटींची मालकीण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अँजेलिना जोली आणि ब्रॅड पिट)
एन्टरटेन्मेंट डेस्कः अभिनेत्री अँजेलिना जोलीला न ओळखणारा शोधूनही सापडणार नाही. हॉलिवूड सिनेमांच्या जगभरातील चाहत्यांमध्ये अँजेलिना लोकप्रिय आहे. हॉलिवूडची ही प्रसिद्ध अभिनेत्री 'चेंजलिंग' आणि 'सॉल्ट' या सिनेमांसाठी जेवढी प्रसिद्ध आहे, तितकीच ती हॉलिवूड अभिनेता ब्रॅड पिटसोबतच्या रिलेशनशिपमध्ये चर्चेत राहिली.
4 जून 1975 रोजी लॉस एंजिलिसच्या कॅलिफोर्निया येथे जन्मलेली अँजेलिना आज 40 वर्षांची झाली आहे. वयाची चाळीशी गाठूनसुद्धा अँजेलिनाचा जलवा कायम आहे. अमेरिकन अभिनेत्रीसोबतच अँजेलिनाला दिग्दर्शिक आणि पटकथा लेखकाच्या रुपातही ओळखले जाते.
एका मुलाखतीत अँजेलिनाने सांगितले, की तिला क्षणाचीही विश्रांती मिळत नाही. मुलांमध्ये सतत व्यस्त राहात असल्याने निवांत क्षण फार कमी मिळतात.
अँजेलिना हॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीतील महागडी अभिनेत्री आहे. वयाच्या 16 वर्षी मॉडेलिंगद्वारे करिअरला सुरुवात करणारी ही अभिनेत्री आज 1283 कोटींची मालकीण आहे. (द रिचेस्ट वेबसाइच्या 2014 च्या सर्वेक्षणानुसार.)
बालकलाकाराच्या रुपात पहिल्यांदा झळकली होती वडिलांसोबत...
अँजेलिनाने तिचे वडील जॉन वोइट यांच्यासोबत 1982 मध्ये आलेल्या 'लुकिंग टू गेट आउट' या सिनेमात बालकलाकाराच्या रुपात काम केले होते. त्यानंतर एका दशकाने 'साइबोर्ग 2' या कमी बजेटच्या हॉलिवूड सिनेमात ती हीरोईनच्या रुपात झळकली.
'हॅकर' हा तिचा पहिला बिग बजेट सिनेमा. 1999मध्ये रिलीज झालेल्या 'ड्रामा गर्ल' आणि 'इंटरप्टेड' या सिनेमांतील अभिनयासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे.
'टॉम्ब रॅडर'ने दिली खरी ओळख
अँजेलिनाला 'लारा क्राफ्ट: टॉम्ब रेडर' या सिनेमातील लारा क्राफ्टच्या भूमिकेने जगभरात प्रसिद्धी मिळवून दिली. या सिनेमाचा पुढचा भाग असलेल्या 'लारा क्राफ्ट टॉम्ब रेडर: द क्रेडल ऑफ लाइफ' या सिनेमाने अँजेलिना हॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री ठरली.
'मिस्टर अँड मिसेज स्मित' आणि 'वाँटेड' या सिनेमांमध्ये साकारलेल्या भूमिकांमुळे अँजेलिना अॅक्शनसुद्धा करु शकते, हे दाखवून दिले. याशिवाय 'ए माइटी हार्ट' आणि 'चेंजलिंग' हे तिचे आणखी दोन गाजलेले सिनेमे आहेत.'चेंजलिंग' या सिनेमासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे ऑस्कर नामांकन मिळाले आहे.
अँजेलिना जोलीची लग्नेसुद्धा झाली प्रसिद्ध
हॉलिवूड अभिनेत्री अँजेलिना जोलीचे खासगी आयुष्यसुद्धा चर्चेत राहिले. कधी वादग्रस्त छायाचित्रांमुळे ती चर्चेत राहिली तर कधी न्यूड फोटोजच्या लिलावामुळे तिने प्रसिद्धी एकवटली. या अभिनेत्रीने एकदा नव्हे तर तीनदा लग्न केले आहे.
28 मार्च 1996 रोजी अँजेलिनाने 'हॅकर' या सिनेमाचे सहअभिनेते जॉनी ली मिलरसोबत पहिले लग्न केले. आपल्या पहिल्या लग्नात अँजेलिनाने रबरचा काळा पँट आणि पांढरे शर्ट घातले होते. त्यावर तिने आपल्या रक्ताने जॉनीचे नाव लिहिले होते. हे लग्न फार काळ टिकले नाही आणि वर्षभरातच दोघे विभक्त झाले.
त्यानंतर 'पुशिंग टिन' या सिनेमाच्यावेळी तिची भेट अमेरिकन अभिनेते बिली बॉब थार्नटनसोबत झाली. 5 मे 2000 रोजी दोघांनी लग्न केले. मात्र 27 मे 2003 रोजी या दोघांचा घटस्फोट झाला. लग्न तुटल्यानंतर अँजेलिनाने प्रतिक्रिया दिली होती, "या गोष्टीने मलाही अचंबित केले आहे. कारण एका रात्रीत आमचे आयुष्य पालटले आहे."
ब्रॅट पिट आणि जेनिफर एनिस्टनमध्ये घटस्फोटाचे बनली कारण
2005 मध्ये अँजेलिनावर अभिनेता ब्रॅड पिट आणि जेनिफर एनिस्टन यांच्या घटस्फोटाला जबाबदार असल्याचा आरोप लागला होता. अँजेलिनाने अनेकदा या बातमीचा इंकार केला, मात्र नंतर ब्रॅडच्या प्रेमात पडल्याचे तिने स्वीकार केले.
11 जानेवारी 2006 रोजी अँजेलिनाने बॅडच्या मुलाची आई होणार असल्याचे पीपल मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत उघड केले. त्यावेळी सार्वजनिकरित्या दोघांनी आपल्या नात्याची कबुली दिली.
अँजेलिना आणि ब्रॅडने तीन मुलांना दत्तक घेतले असून मॅडॉक्स, पॅक्स आणि जहारा ही त्यांची नावे आहेत. तर अँजेलिनाने तीन मुलांना जन्म दिला. शीलोह, नॉक्स आणि विवियन ही त्यांची नावे आहेत. 9 वर्षे डेटिंग केल्यानंतर अँजेलिना आणि ब्रॅडने 23 ऑगस्ट 2014 रोजी लग्न केले.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, अँजेलिनाच्या खासगी आयुष्यातील निवडक छायाचित्रे...