आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉलिवूडमध्ये सर्वाधिक कमाई करणारी अभिनेत्री ठरली अँजेलिना जोली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑस्कर विजेती अभिनेत्री अँजेलिना जोली ही हॉलिवूडमधील सर्वाधिक कमाई करणारी अभिनेत्री ठरली आहे. अमेरिकेतील कॅम्पेन ग्रुपच्या वुमन्स मीडिया सेंटरने एक रिपोर्ट प्रकाशित केला आहे. त्यांनी सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप टेन कलाकारांची यादी जाहीर केली आहे. त्यानुसार अँजेलिना ही सर्वाधिक कमाई करणारी अभिनेत्री आहे. तिची 2013 मध्ये वार्षिक कमाई होती 33 मिलियन डॉलर्स म्हणजे सुमारे 200 कोटी रुपये.
अभिनेत्रींमध्ये अँजेलिनाच्या पाठोपाठ जेनिफर लॉरेन्सचा क्रमांक लागतो. जेनिफरची वार्षिक कमाई 26 मिलियन डॉलर्स इतकी आहे.
अभिनेत्री ख्रिस्टिन स्टुअर्ट 21.5 मिलियन डॉलर्सच्या कमाईसह तिस-या स्थानावर, जेनिफर अॅनिस्टन 20 मिलियन डॉलर्ससह चौथ्या स्थानावर आहे. तर पाचव्या स्थानावर एमा स्टोन असून तिची वार्षिक कमाई 16 मिलियन डॉलर्स इतकी आहे.
अभिनेत्यांमध्ये रॉबर्ट डाउनी ज्युनिअरचा पहिला क्रमांक आहे. त्याची वार्षिक कमाई 75 मिलियन डॉलर्स म्हणजेच तब्बल 465 कोटी रुपये इतकी आहे. रॉबर्टनंतर चॅनिंग टेटम (60 मिलियन डॉलर्स), ह्यू जॅकमन (55 मिलियन डॉलर्स) आणि मार्क वॉलबर्ग (51 मिलियन डॉलर्स) हे येतात.