आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतीच्या अफेयर्समुळेे अँजेलिना त्रस्त; 6 अपत्यांसाठी ब्रॅंड पिटला देणार घटस्फोट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लॉस एंजिलिस- हॉलीवुडमधील कपल अँजेलिना जोली आणि ब्रॅड पिट यांंच्यात लवकरच काडीमोड होणार आहे. पतीच्या अफेयर्सने अँजेलिनाच्या नाकी नऊ आणलेे आहेे. परिणामी 6 मुलांंसाठी तिने पतीला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला आहे. तिने तसा रितसर अर्जही केला आहे.

अँजेलिना आणि ब्रॅड पिट दोन वर्षांपूर्वी फ्रान्समध्ये विवाहाच्या बंधनात अडकले होते. या दाम्पत्याला 6 अपत्य आहेत. त्यापैकी तीन दत्तक घेतलेले आहेत. ब्रॅड पिटचे दोन अॅक्ट्रेससोबत 'गुटूर गू' सुरु असल्याने अँजेलिना कमालीची त्रस्त झाली आहे.

काय आहे हे प्रकरण...?
- सेलिब्रिटी मॅगझीन 'टीएमजेड'नुसार, अँजेलिना हिने मंगळवारी डिवोर्ससाठी कोर्टात अॅप्लीकेशन फाइल केली आहे. पतीसोबत आता कोणताही समझोता होऊ शकत नसल्याचे तिने अर्जात म्हटले आहे. परिणामी तिने पतीसोबत फारकत घेण्याचा निर्णय घेतला आहे.
- दुसरीकडे, पिटने मौन स्विकारले आहे. तो सध्या एका सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिजी आहे. पिट 53 तर अँजेलिना 41 वर्षांंची आहे.

काय म्हणाली अँजेलिना?
- रिपोर्टनुसार, अँजेलिना हिने कोर्टात केल्याला अर्जात म्हटले आहे की, तिला सहाही मुलांसोबत राहायचे आहे. या दाम्पत्याने वेगवेगळ्या देशातूून तीन मुले दत्तक घेतले आहेत. तर तीन मुलांंना अँजेलिना हिने जन्म दिला आहे.
- दुसरीकडे, पिटनेही मुलांसोबत राहाण्याची इच्छा दर्शवली आहे. पण, पिट वडिलांच्या जबाबदार्‍या पार पाडू शकत नसल्याचा आरोप अँजेलिना हिने केला आहे. पण खरे कारण मात्र वेगळेे असल्याची चर्चा आहे. पिटचे दोन महिलांसोबत विवाहबाह्य संंबंंध असल्याचे बोलले जात आहे.
- दोघांंनी ऑगस्ट 2014 मध्ये विवाह केला होता. मात्र, दोघे 2004 पासूनच लिव्ह इन रिलेशनशिपमध्येे होते. दोघे जुलैै महिन्यात शेवटचे एकत्र दिसले होते.

पुढील स्लाइडवर वाचा... पती- पत्नी और वो?

(Pls Note-
तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...