आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Angelina Jolie Makes Her First Public Appearance After Double Mastectomy

PHOTOS : ब्रेस्ट सर्जरीनंतर पहिल्यांदाच जगासमोर आली अँजेलिना जोली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अँजेलिना जोली ब्रेस्ट सर्जरीनंतर पहिल्यांदाच एका सार्वजनिक कार्यक्रमात दिसली. येथे ती तिचा बॉयफ्रेंड ब्रॅड पिटच्या आगामी 'वर्ल्ड वॉर झेड' या सिनेमाच्या प्रीमिअरमध्ये सहभागी झाली होती. अँजेलिना ब्रॅड पिटच्या हातात हात घालून रेड कार्पेटवर अवतरली. येथे ती खूपच कॉन्फिडंट दिसली. ब्लॅक कलरच्या गाऊनमध्ये तिचे सौंदर्य खुलून दिसले.
अँजेलिनाने काही दिवसांपूर्वीच ब्रेस्ट कॅन्सरच्या भीतीने एका सर्जरीच्या माध्यमातून आपले दोन्ही स्तन काढून टाकले होते. तिने खुलासा केला होता की, तिच्या शरीरात बेस्ट कॅन्सरचा धोका निर्माण करणारे बीआरसीए 1 जीन आहेत. त्यामुळे मस्टेक्टॉमी ही सर्जरी करुन तिने आपले दोन्ही स्तन काढून टाकले.
अँजेलिनाने सार्वजनिकरित्या ही गोष्ट कबूल केली होती. तिच्या या हिंमतीला सगळ्यांनी दाद दिली होती.

बघा या प्रीमिअरला पोहोचलेल्या अँजेलिनाची ही खास छायाचित्रे...