(लॉर्ड्स कमेटीच्या समोर रिपोर्ट देताना अमेरिकन अभिनेत्री अँजेलिना जोली)
लंडन/न्यूयॉर्क- हॉलिवूड अभिनेत्री अँजेलिना जोलीने आयएसआयएसला मानवाचा शत्रु म्हणून संबोधले आहे. तिने सांगितले, की वॉर जोनमध्ये जगातील सर्वात भयावह दहशतवादी ग्रुप (ISIS) 'सेक्स अटॅक्स'चा शस्त्राच्या रुपात वापर करत आहेत. मंगळवारी (8 सप्टेंबर) लॉर्ड्स कमेटीला तिने पूरावेसुध्दा दिले आहे. मागील दिवसांत तिने इराक-सीरियाच्या अशा भागांचा दौरा केला होता, जिथे युध्दाची परिस्थिती निर्माण झाली आहे. अँजेलिना जोली अभिनेत्री तसेच मानवी हक्क कार्यकर्तीसुध्दा आहे. ती यापूर्वीसुध्दा अशा दौ-यावर गेलेली आहे. यावेळी ती यूएनचे स्पेशल दूत म्हणून या दौ-यावर गेली होती.
अभिनेत्रीने काय सांगितले?
- तिने सांगितले, की मागील दिवसांत ती वॉर जोनला (आयएसआयएसच्या हल्ल्याने प्रभावित इराक-सीरियाचा परिसर) गेली होती. तिथे ती एका सात वर्षांच्या मुलीला भेटली होती. त्या मुलीला 40 अमेरिकन डॉलरमध्ये विकून बलात्काराचा शिकार बनवण्यात आले होते. अँजेलिनाने आव्हान दिले, की वॉर जोनमध्ये सेक्शुअल व्हायलेन्सने सर्व उध्वस्त होऊ शकते.
- अँजेलिनाने सांगितले, की आयएसआयएस बलात्कार आणि महिलांच्या विरोधात हिंसेला 'पॉलिसी'च्या रुपात वापरत आहेत.
वॉर जोनमध्ये कुणासोबत गेली होती अँजेलिना?
अँजेलिनासोबत यूकेची फॉरेन सेक्रेटरी व्हिलिअम ह्यूजसुध्दा होती. कमेटीसमोर व्हिलिअमने सांगितले, की वॉरमध्ये बलात्काराचा ज्याप्रकारे वापर केला जात आहे, तो पुरुषांसाठी लाजेची बाब आहे. तिने आशा व्यक्त केली आहे, की प्रयत्न केल्यास या समस्येपासून मुक्ती मिळवता येऊ शकते. अँजेलिना आणि व्हिलिअम दोघीही वॉर जोनमधील बलात्कार थांबवण्यासाठी कॅम्पन चालवतात. मागील वर्षी दोघींनी लंडनमध्ये एक जागतिक परिषदेत घेतली होती. त्यामध्ये 100 देशांमधील लोक पोहोचले होते. जागतिक परिषदेत या समस्येला समोर आणले होते आणि त्याला संपवण्यासाठी योजना आखली होती.
काय कारण आहे?
अँजेलिनाला विचारण्यात आले, की या समस्येचे मुख्य कारण काय आहे? यावर तिने सांगितले, 'मला वाटते सर्वात हे समजणे गरजेचे आहे, की हे समस्येचे कारण आहे का? हे सर्व सेक्शुअल नाही, हिंसक आहे. दहशतवाद्यांसाठी एक क्रूर हत्यार आहे. वादग्रस्त भागांशिया अनेक देशांत हे विविध रुपात घडते. मी अजून असे ठिकाण पाहिले नाहीये जिथे अशा घटना घडत नाहीये.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा अँजेलिना जोलीने यापूर्वी कोणत्या भागांना भेट दिली होती...