आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अँजेलिना जोलीच्या डोक्यात संशयाचा किडा, नव-याची करणार DNA चाचणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लॉस एंजिलिस: हॉलिवूड अभिनेत्री अँजेलिना जोली आणि ब्रॅड पिट यांच्या नात्यातील तणाव वाढतच जात आहे. अँजेलिनाने ब्रॅड पिटची डीएनए चाचणी करण्याचा निर्णण घेतला आहे. कारण अँजेलिनाला शंका आहे, की ब्रॅड पिट अभिनेत्री मेलिसा एदरीजच्या मुलांचा बाप आहे.
वेबसाईट ‘एसशोबिज डॉट कॉम’च्या रिपोर्टनुसार, मेलिसाने अलीकडेच एका ऑस्ट्रेलियन टॉक शोमध्ये खुलासा केला होता, की तिने आपत्य प्राप्तीसाठी ब्रॅड पिटकडून शुक्राणु घेण्याचा विचार केला होता.
मेलिसाने त्यानंतर स्पष्ट केले, की तिने तिची मुली बेली आणि बेकेट यांना जन्म देण्यासाठी गायक डेव्हिड क्रॉसबीचे शुक्राणु घेतले होते. परंतु मेलिसाच्या या खुलास्याने अँजेलिनाच्या डोक्यात शंकेचे भूत संचारले आहे. अंजेलिना शंका आहे, की मेलिसाच्या मुलांचा बाप ब्रॅड असू शकतो.
एका सूत्रांच्या सांगण्यानुसार, 'अँजेलिनाला हा विषय संपवायचा आहे. म्हणून ती ब्रॅडची डीएनए चाचणी करणार आहे. परंतु ब्रॅड तिच्या या विचाराला मानसिक आजार असल्याचे सांगतोय.'
सूत्रांनी असेही सांगितले, की अँजेलिनाने ब्रॅडला सांगितले, की जर त्यांने डीएनए चाचणी केली नाही तर ती सरळ मेलिसाकडे जाऊन उत्तर मागेल.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, पुरुष आणि महिलांसोबत होते ब्रॅड पिटचे संबंध...