आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनयासाठी अर्नाल्ड शिकले होते बॅले डान्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हॉलिवूडचे दिग्दज अभिनेता अर्नाल्ड श्वार्जनेगर यांनी अभिनयाव्यतिरिक्त राजकारणातसुध्दा पाऊल ठेवले आहे. ते एक उत्कृष्ट फायटरसुध्दा होते. 80च्या दशकात बॉक्स ऑफिसवर त्यांचे सिनेमे सुपरहिट ठरले.
हेच कारण होते, की त्यांना लोक अ‍ॅक्शनचे सुपरस्टार म्हणत होते.
वेटलिफ्टर ते अभिनेता असा प्रवास पार करणारे अर्नाल्ड यांना डान्सचीसुध्दा आवड आहे. परंतु अर्नाल्ड यांना बॅले डान्स येतो हे खूप कमी लोकांना माहित असेल. 1976मध्ये 'पम्पिंग आयरन' या डॉक्युमेंट्री सिनेमाच्या अभिनयासाठी डान्सर मरिआने क्लॅरीकडून ते बॅले डान्स शिकले होते.
हा सिनेमा बॉडी बिल्डिंगवर आधारित आहे. त्यानंतर अर्नाल्ड यांच्या सिनेमाचा आलेख उंचावला होता. परंतु या सिनेमानंतर त्यांना कोणत्याही सिनेमात असा डान्स करताना बघितल्या गेले नाही.