आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Iranian Film \'Taxi\' Wins Golden Bear At Berlin International Film Festiva

बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात इराणी दिग्दर्शकास गोल्डन बेअर पुरस्कार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बर्लिन - इराणमधील प्रसिद्ध दिग्दर्शक जफर पनाही यांना यंदाच्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील सर्वोच्च गोल्डन बेअर पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. त्यांच्या ‘टॅक्सी’ या चित्रपटासाठी हा पुरस्कार जाहीर करण्यात आला.

पनाही सध्या इराणमध्ये स्थानबद्ध असून सरकारविरुद्ध प्रचार केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. २०१० मध्ये पनाही यांच्या चित्रपट निर्मितीवर २० वर्षांसाठी बंदी घालण्यात आली होती. या बंदीनंतरही पनाही यांनी चित्रपट निर्मिती सुरूच ठेवली. बर्लिन महोत्सवात पनाही यांच्या वतीने त्यांच्या भाचीने पुरस्कार स्वीकारला.
चिलीचे दिग्दर्शक पाब्लो लॅरेन यांना ‘द क्लब’ या चित्रपटासाठी सिल्व्हर बेअर या महोत्सवामधील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वोच्च पुरस्काराने गौरवण्यात आले. ब्रिटिश दिग्दर्शक अँड्रयू हाय यांच्या ‘४५ इयर्स’ चित्रपटात मध्यवर्ती भूमिका साकारलेल्या टॉम कर्टनी व शार्लोट रँपलिंग यांना अनुक्रमे सर्वोत्कृष्ट अभिनेता व सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. रोमानियाचे दिग्दर्शक रॅडू जूड यांना ज्युरी पुरस्कार मिळाला.