आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 21 Pre And Post Visual Effects Of Hollywood Films

Behind The Scenes : इफेक्ट्सची कमाल, असे शूट होतात अचंबित करणारे SCENES

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('लाइफ ऑफ पाई' या सिनेमातील एका सीनमध्ये सूरज शर्मा)
एन्टरटेन्मेंट डेस्क : सध्याच्या काळातील सर्व सिनेमांमध्ये व्हिज्युअल इफेक्ट्सचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो, हे आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. वीएफएक्स हे सिनेमांमध्ये जीव ओतण्याचा आणि सीन्सला आय कॅचिंग करण्याचे काम करते. जेव्हा टीव्ही किंवा थिएटरमध्ये आपण एखादा फँटसी सीन बघतो, तेव्हा आपण खरंच एखाद्या जादुई दुनियेत आहोत, असा भास होतो.
पडद्यावर एकामागून एक येणारी ही दृश्ये खरी आहे, असं आपल्याला वाटतं असतं. मात्र सत्य हे आहे, की कल्पनाशक्तीच्या पलीकडील दृश्ये साकारण्यासाठी मानवी बुद्धी आणि कम्प्युटर तंत्रज्ञानाचा मोठा वाटा असतो. 2012 मध्ये रिलीज झालेला दिग्दर्शक एंग यांच्या 'लाइफ ऑफ पाय' या सिनेमाला समीक्षक आणि प्रेक्षकांनी पसंतीची पावती दिली होती. सिनेमामध्ये उत्कृष्ट वीएफएक्सचा वापर करण्यात आला होता. या सिनेमाला वीएफएक्ससाठी ऑस्कर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
('लाइफ ऑफ पाय' या सिनेमाला ऑस्करमध्ये अकरा विभागांत नामांकने मिळाली होती. यापैकी चार ऑस्कर सिनेमाने आपल्या नावी केले.)
वरील छायाचित्रात तुम्ही विज्युअल इफेक्ट्स पूर्वीचे आणि नंतरचे दृश्य बघू शकता.
Divyamarathi.com तुम्हाला हॉलिवूड सिनेमातील अशीच काही दृश्ये दाखवत आहेत, जी वीएफएक्सच्या मदतीने तयार करण्यात आली आहेत. पुढील स्लाईड्समध्ये पाहा सिनेमाचे Before And After Effects Photos..