आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘लाइफ ऑफ पाय’, ‘अ‍ॅर्गो’ची मोठी कमाई

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लॉस एंजिल्स - ऑस्कर पुरस्कार मिळवणा-या ‘लाइफ ऑफ पाय ’, ‘अ‍ॅर्गो ’ या चित्रपटांनी पुरस्काराच्या आठवड्यानंतर बॉक्स ऑफिसवरही चांगली कामगिरी करण्यास सुरुवात केली आहे. ‘सिल्व्हर लायनिंग्ज प्लेबुक ’ या चित्रपटामध्ये नवीन प्रेक्षकांना रस वाटू लागल्याचे चित्र पाहायला मिळाले.

अँग ली यांच्या 'लाइफ ऑफ पाय'ने चार ऑस्कर मिळवले होते. अमेरिकेतील चित्रपटगृहात पायने सलग पंधराव्या आठवड्यात प्रेक्षकांना आकर्षित करणे सुरूच ठेवले आहे. चित्रपटाने एका आठवड्यात 43 टक्के एवढी कमाई केली आहे. 20 लाख डॉलर्स एवढी कमाई चित्रपटाने केली. चित्रपटाने देशांतर्गत 1 कोटी डॉलर्स एवढा गल्ला गोळा केला आहे.

फँटसीतील थरार प्रेक्षकांना आवडू लागला आहे. जगभरात म्हणूनच त्याला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली. जगभरातील एकूण उत्पन्न 4 कोटी डॉलर्सच्या घरात पोहोचले आहे. अ‍ॅर्गोनेही एका आठवड्यात 21 टक्के उत्पन्न मिळवले. 20 लाख डॉलर्सची कमाई चित्रपटाने केली. देशभरातील उत्पन्न 1 कोटी डॉलर्सहून अधिक आहे. सिल्व्हर लायनिंग्ज चित्रपटाने देखील जोरदार गल्ला भरला आहे.