मुंबई - बॉक्स ऑफिसवर आज (1 मे) 'द अमेजिंग स्पायडर मॅन 2' हा हॉलिवूड सिनेमा रिलीज झाला. या सिनेमाच्या रिलीजपूर्वी याचे जोरदार प्रमोशन करण्यात आले. त्यामुळे हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर गर्दी खेचेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. इंग्रजीसह हा सिनेमा हिंदी, तामिळ आणि तेलगु भाषेत रिलीज होणार आहे. 'द अमेजिंग स्पायडर मॅन 2'चे दिग्दर्शक मार्स वेब यांनी भारतात शंभर कोटींच्या व्यवसायाचे लक्ष्य ठेवले आहे.
यावर्षी सलमानच्या 'जय हो' हा सिनेमा वगळता कोणत्याही सिनेमाने शंभर कोटींचा व्यवसाय केलेला नाहीये. त्यामुळे 'द अमेजिंग स्पायडर मॅन 2'साठी शंभर कोटींचा पल्ला गाठणे हे आव्हान असणार आहे. तसे पाहता या सिनेमाचा पहिला भाग 'स्पायडर मॅन' हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस पडला होता.
'द अमेजिंग स्पायडर मॅन 2' या सिनेमातील हिंदी व्हर्जनसाठी इलेक्ट्रो या पात्रासाठी आपला आवाज दिला आहे.
आज या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला 'स्पायडर मॅन' या सिनेमात झालेल्या चुका दाखवत आहोत. या चुकांकडे कदाचित प्रेक्षकांचे लक्ष गेले असावे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा 'स्पायडर मॅन' सिनेमात आढळलेल्या चुका...