मुंबई - 'बिग बॉस'च्या 11 व्या सिझनमध्ये यावेळी पुन्हा एकदा फिरंगी तडका लावण्यासाठी लुसेंडा निकोलस शोमध्ये पडोसी (शेजारी) कंटेस्टंट बनून आली आहे. लुसेंडा सध्या शोच्या इतर पडोसी कंटेस्टंट्सबरोबर सिक्रेट रूममध्ये राहत आहे. लवकरच त्यांनी मुख्य घरात एंट्री होणार आहे.
मिस वर्ल्ड साऊथ ऑस्ट्रेलिया बनलेली लुसेंडा...
- लुसेंडा ऑस्ट्रेलियन मॉडेल आणि योगा इन्स्ट्रक्टर आहे.
- 2010 मध्ये ती मिस वर्ल्ड साऊथ ऑस्ट्रेलिया बनली आहे.
- लुसेंडाला जेव्हा हा किताब मिळाला तेव्हा ती अवघ्या 17 वर्षांची होती.
रियल लाईफमध्ये ग्लॅमरस आहे लुसेंडा
- लुसेंडा रियल लाइफमध्ये भरपूर ग्लॅमरस आहे. ती नेहमी तिच्या सोशल हँडलवर बिकिनी फोटो पोस्ट करत असते.
- लुसेंडाचे इन्स्टाग्रामवर सुमारे 80 लाख फॉलोअर्स आहेत.
- काही ऑस्ट्रेलियन फिल्म्समध्येही तिने काम केले आहे.
बॉलिवूड चित्रपटांतही अॅक्टीव्ह आहे लुसेंडा
- लुसेंडा काही बॉलिवूड चित्रपटांतही झळकली आहे.
- ती अक्षय कुमारचा चित्रपट 'बॉस'(2010) च्या एका गाण्यात 'पार्टी ऑल नाइट' मध्ये झळकली आहे.
- नुकत्यात रिलीज झालेल्या कार्तिक आर्यनच्या 'गेस्ट इन लंदन'(2017) मध्येही लुसेंडाने छोटीशी भूमिका केली आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, 'बिग बॉस-11' ची कंटेस्टंट लुसेंडा निकोलस हिचे काही Photos...