आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'Day@MJ : एक असा सुपरस्टार, ज्याला ओळखतो जगभरातील प्रत्येक जण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो: मायकल जॅक्सन)
आजच्या दिवशी (29 ऑगस्ट) अमेरिकेमधील इंडियाना या प्रांतातील गैरी या छोट्या शहरात मायकल जॅक्सनचा जन्म झाला होता. आज जगभरात त्याचा 56वा वाढदिवस साजरा केला जात आहे. आई-वडिलांचा आठवा मुलगा मायकल जॅक्सनला बालपणापासून संगीतात रुची होती.
1964मध्ये तो त्याच्या भावासोबत 'द जॅक्सन' ग्रुपमध्ये सामील झाला होता. सहा वर्षांनंतर 1971मध्ये त्याने संगीतात स्व:बळावर करिअर उभे केले. 1980दरम्यान जॅक्सन संगीताचा स्टार बनला होता. 'बीट इट, बिली जीन' आणि 'थ्रिलर' या अल्बमने त्याला लोकप्रिय केले. त्याला जगातील प्रत्येक माणूस ओळखायला लागला होता. लोकांना पॉप संगीताची ओळख करून देणा-या मायकल जॅक्सनला अनेक लोकांनी पाहिलेदेखील नव्हते. तरी त्याचे चाहते बनले होते.
पॉप संगीताचे जगच टाकले बदलून..
- यशाचे शिखर गाठणा-या मायकल जॅक्सनचा 'थ्रिलर' त्याकाळातील ऑलटाइम बेस्ट सेलिंग अल्बम ठरला होता. त्यानंतर 'ऑफ द वॉल' (1979), बॅड (1987), डेन्जरस, (1991) आणि हिस्ट्री (1995)ने त्याला 'किंग ऑफ पॉप' बनवले.
- गिनीज अवॉर्ड, 13 ग्रॅमी अवॉर्ड, 26 अमेरिकन म्युझिक अवॉर्ड, ग्रॅमी लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड आणि ग्रॅमी लीजेंड अवॉर्डने त्याला सन्मानित करण्यात आले आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्डसमवेत अनेक अवॉर्ड नावी करणारा मायकल जॅक्सन एकमेव कलाकार होता, ज्याने पॉप संगीताचे जगच बदलून टाकले.
- 1994-1999मध्ये त्याने लिसा मेरी आणि दिबोराह जेनी या दोन महिलांसोबत लग्न केले. त्याचे एकही लग्न टिकू शकले नाही. त्याला तीन मुले आहेत.
वादातही अडकला होता.
- 1990च्या दशकात बाल लैगिंक शोषणाच्या आरोपात तो अडकला होता. परंतु कोर्टाबाहेर 150 कोटींमध्ये साम्यंजस्याने प्रकरण सोडवण्यात आले होते. 2005मध्येही अशाच प्रकरणाचा सामना त्याला करावा लागला होता. मात्र, पुराव्याअभावी प्रकरण मिटले.
- 2002मध्ये नवजात मुलाला कपड्याने झाकून त्याला इमारतीच्या बाहेर लटकवण्याच्या प्रकरणातसुध्दा मायकलला ब-याच वादाचा आणि समस्यांचा सामना करावा लागला होता.
- 1416 कोटींच्या मालमत्तेचा मालिक मायकल जॅक्सनने करिअरच्या सुरुवातीला त्वचेचा रंग बदलण्यासाठी एक प्लास्टिक सर्जरी केली होती. त्यानंतर अनेकदा चेह-यावर सर्जरी करून त्याने स्वत:चा लूकच बदलून टाकला. त्यासाठी तो अनेकदा वादांना सामोरे गेला होता. त्याला महिलांप्रमाणे राहण्याची आवड असल्याच्या टिका त्याच्यावर होत होत्या.
मायकल जॅक्सनचा मृत्यू अद्याप रहस्यच...
कन्सर्ट सीरीज 'धिस इज इट'च्या तयारीच्या काळातत अंमली पदार्थांचे अत्याधिक सेवन केल्याने मायकल जॅक्सनला हृदयविकाराचा झटका आल्याचे बोलले जाते. 25 जून 2009 रोजी जॅक्सनेन जगाचा निरोप घेतला. तपासणीदरम्यान जॅक्सनचे फॅमिली डॉक्टर कोनरॉड मुरै यांच्यावर त्याच्या हत्येचा आरोप होता. जॅक्सनच्या मृत्यूने जगभरात शोक पसरला होता.
मृत्यूनंतरही बनवले रेकॉर्ड...
मायकल जॅक्सनच्या मृत्यूनंतर 2009मध्ये जॅक्सन अल्बम बेस्ट सेलिंग ठरला. एकट्या अमेरिकेत 82 लाख आणि जगभरात त्याचे 3.5 कोटी अल्बमच्या प्रती विकल्या गेल्या होत्या. एका आठवड्यात त्याचे 26 लाखांपेक्षा जास्त गाणे डाऊनलोड झाले आणि हे आकडे इतिहासात सर्वाधिक आहेत.
समाजसेवेत दिले होते स्वतःला झोकून...
मायकल जॅक्सन मध्यमवर्गीय कुटुंबातला मुलगा होता. तो प्रसिध्द झाला मात्र गरीब-श्रीमंत यांच्यात त्याने कधीच भेदभाव केला नाही. त्याने चॅरिटीसाठी जगभरात कन्सर्टसुध्दा केले होते. 2009मध्ये गिनीज संस्थाने त्याला 39 चॅरिटीला सहयोग केल्याने सन्मानित केले होते. त्याच्यापूर्वी कदाचितच एखादा कलाकार होऊन गेला असावा ज्याने इतक्या चॅरिटीला मदत केली आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा काळानुसार कसा बदलला सुपरस्टार मायकल जॅक्सनचा चेहरा...