Home »Hollywood» Birthday Special Story About Cameron Diaz Life Facts

एका चित्रपटासाठी 95 कोटी घ्यायची ही अॅक्ट्रेस, या कारणामुळे सोडली अॅक्टींग

दिव्य मराठी वेब टीम | Aug 30, 2017, 11:35 AM IST

अॅक्ट्रेस कॅमरुन डायज आज 45वा वाढदिवस साजरा करत आहे. हॉलिवूडच्या सर्वाधिक फीस घेणाऱ्या अॅक्ट्रेसेसपैकी एक असलेलेल्या कमरुनने 1994 मध्ये अॅक्ट्रेस म्हणून डेब्यू केला होता. पण सध्या ती अॅक्टींगपासून दूर आहे. त्याचे कारण म्हणजे सतत काम करून ती एवढी बिझी झाली होती, की तिला खासगी आयुष्यच शिल्लक राहिले नाही. त्यामुळे तिने चित्रपटांत काम करणे थांबवले. 2014 मध्ये ती अखेरची चित्रपटांत झळकली होती. कॅमरुन एका चित्रपटासाठी 95 कोटी रुपये घ्यायची.

16 व्या वर्षी सुरू केले होते मॉडेलिंग..
कॅमरुनचा जन्म कॅलिफोर्नियामध्ये झाला होता. तिने शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर वयाच्या 16 व्या वर्षीच मॉडेलिंग सुरू केले होते. त्यांनी मॉडेलिंग एजन्सी एलाइट मॉडेल मॅनेजमेंटबरोबर काम करायला सुरुवात केली. त्यावेळी ती 17 वर्षांची होती, त्यामुळे 'Seventeen'(1990) मॅगझिनची ची कव्हरगर्ल बनली होती. तिने 2 ते 3 महिने मॉडेल म्हणून काम केले. 1992 मध्ये तिने एस अँड एम लेदर फॅशन लिग्नियरसाठी टॉपलेस फोटोशूट केले होते. पण तिचे ते फोटो कधीही समोर आले नाहीत.

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, कॅमरूनशी संबंधित आणखी काही बाबी...

Next Article

Recommended