आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकेकाळी लोकांचे केस कापायची ही सिंगर-अॅक्ट्रेस, आता आहे 2234 कोटींच्या संपत्तीची मालकीन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बियॉन्स आणि जे जेड. - Divya Marathi
बियॉन्स आणि जे जेड.
प्रसिद्ध गायिका आणि अॅक्ट्रेस बियॉन्सने नुकताच (4 सप्टेंबर) तिचा 36वा वाढदिवस साजरा केला. सध्या 2234 कोटींची मालकीन असलेली बियॉन्स सुरुवातीच्या काळात सलूनमध्ये लोकांचे केस कापायचे काम करत होती. परिश्रमाच्या जोरावर तिने ओळख मिळवली आहे. टेक्सासमध्ये जन्मलेल्या बियॉन्सला लक्झरी लाइफ आवडते. तिच्याजवळ कास कार कलेक्शन, मॅन्शन, यॉट, आइलंडही आहे. तिने 2008 मध्ये रॅपर जे जेडबरोबर लग्न केले होते. त्यांना तीन मुले आहेत. 

लहानपणापासून आवडायचे संगीत 
बियॉन्सला बालपणीपासून गाण्याची आवड होती. 8 वर्षांच्या वयात तिने गर्ल एंटरटेनमेंट ग्रुपसाठी ऑडिशन दिले आणि तिची निवड झाली. अशा प्रकारे तिने हळू हळू सिंगिंग टॅलेंटच्या जोरावर यश मिळवले. पण तिला सहज यश मिळाले नाही. पैसे कमावण्यासाठी तिने सलूनमध्येही काम केले. डेस्टीनी चाइल्ड नावाचा ग्रुप तिने सुरू केला. 1997 मध्ये या ग्रुपचा साऊंडट्रॅक 'मेन इन ब्लॅक'मध्ये वापरला आणि तो हिट झाला. हळू हळू ति या ग्रुपची लीड सिंगर बनली. गाण्याबरोबरच तिने चित्रपटांत अॅक्टींग सुरू केले. 'Austin Powers in Goldmember'(2002) द्वारे तिने डेब्यू केला. तर तिचा डेब्यू अल्बम 'Dangerously in Love' 2003 मध्ये रिलीज झाला. तिच्या या अल्बमने 5 ग्रॅमी अवॉर्डही जिंकले. फोर्ब्सने तिला 2015 मधील मोस्ट पॉवरफुल फिमेल एंटरटेनर जाहीर केले होते. तर 2016 मध्ये ती पर्सन ऑफ द ईयरच्या यादीत होती. या यादीत ती सहाव्या स्थानी होती. 
 
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, बियॉन्सशी संबंधित काही आणखी बाबी.. 
 
 
बातम्या आणखी आहेत...