आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वयाच्या 22 व्या वर्षी बॉबी क्रिस्टीनाचे निधन, 5 महिन्यांपूर्वी आढळली होती बेशुद्धावस्थेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जॉर्जियाः दिवंगत टीव्ही रिअॅलिटची स्टार व्हिटनी ह्युस्टन आणि गायक बॉबी ब्राउन यांची एकुलती एक मुलगी बॉबी क्रिस्टिनाचे 26 जुलै रोजी निधन झाले. बॉबी केवळ 22 वर्षांची होती. बॉबी प्रसिद्ध अमेरिकन टीव्ही स्टार होती. पाच महिन्यांपूर्वी ती आपल्या अपार्टमेंटच्या बाथटबमधअये बेशुद्धावस्थेत आढळी होती. तेव्हापासून तिची मृत्यूशी झुंज सुरु होती.
आपल्या ऑफिशिअल स्टेटमेंटमध्ये बॉबीच्या कुटुंबीयांनी तिच्या निधनाविषयी सांगितले. तिच्या कुटुंबीयांनी म्हटले, "आता ती ईश्वराकडे गेली आहे. गेल्या काही महिन्यांत बॉबीच्या चाहत्यांनी दिलेल्या प्रेमासाठी आम्ही त्यांना धन्यवाद देतो."
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ड्रगच्या ओव्हरडोसमुळे बॉबीचा मृत्यू झाला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे 2012 मध्ये बॉबीची आई व्हिटनीसुद्धा बाथटबमध्ये बेशुद्धावस्थेत आढळली होती. त्यानंतर तिचे निधन झाले होते.
सेलिब्रिटी किड असल्याने बॉबी नेहमीच चाहत्यांमध्ये आकर्षणाचे केंद्रबिंदू राहिली होती. निक गोर्डनसोबतच्या अफेअरमुळेसुद्धा ती प्रसिद्धीझोतात आली होती. ह्युस्टन कुटुंबाने निक गोर्डनाल दत्तक घेतले होते. त्यावेळी बॉबी खूप लहान होती. नंतर बॉबीने निकसोबत लग्न केले होते. त्यावरुन बराच वाद निर्माण झाला होता. बॉबी स्वतः एक गायिका होती आणि 'बीईंग बॉबी ब्राउन' या शोमुळे ती लोकप्रिय झाली होती.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, बॉबी क्रिस्टीनाची निवडक छायाचित्रे...