(हॉलिवूड अभिनेत्री अँजेलिना जोली आणि ब्रॅड पिट)
मुंबई - हॉलिवूडचे प्रसिद्ध कपल अँजेलिना जोली आणि ब्रॅड पिट तब्बल नऊ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर अलीकडेच लग्नगाठीत अडकले. लग्नानंतर हे दोघे हनीमूनसाठी गोंजो येथील माल्टा आयलँडवर (युरोपीयन महाद्विप) गेले आहेत.
बातमी आहे, की या कपलने माल्टातील स्थानिक लोकांना आयलँड रिकामे करण्यासाठी जवळपास 1 कोटी 20 लाख 48 हजार रुपये दिले आहेत. या आयलँडवर एकांतात वेळ घालवण्याची या नवदाम्पत्याची इच्छा असल्यामुळे त्यांनी एवढी मोठी रक्कम चुकती केली आहे. हॉलिवूडमध्ये ब्रँजेलिना या नावाने प्रसिद्ध असलेले हे कपल आपला हनीमून एन्जॉय करु शकावे, यासाठी आयलँडमधील लोक तेथून जाण्यास तयार झाले.
हे कपल आपल्या आगामी 'बाय द सी' या सिनेमाचे शूटिंग गोंजो येथील याच माल्टा आयलँडवर करणार आहेत. या सिनेमातील काही इंटीमेट सीन्सचे शूटिंग येथे होणार आहेत. 'बाय द सी' हा सिनेमा अँजेलिना दिग्दर्शित करत असून पुढील वर्षी तो रिलीज होणार आहे.
अँजेलिना आणि ब्रॅडने 23 ऑगस्ट रोजी फ्रान्समुळे गुपचुप लग्न थाटले. हनीमूनच्या काळात
त्यांची सहा मुले (मडोक्स, पॅक्स, जाहरा, विविएने, शिलोह आणि नोक्स) त्यांच्यासोबत राहणार आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा अँजेलिनाचा वेडिंग गाऊन आणि काही अन्य छायाचित्रे...