आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Brad Pitt Buys $5M Yacht, Part Of Wedding Day Plans

जोधपूरमध्ये रेशीमगाठीत अडकणार ब्रॅड-अँजेलिना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - हॉलिवूडमधील प्रसिद्ध आणि नेहमीच चर्चेत असणारं जोडपं म्हणजे ब्रॅड पिट आणि अँजेलिना जोली. येत्या मे महिन्यात हे जोडपं रेशीमगाठीत अडकणार असल्याची चर्चा असून त्यांनी लग्नस्थळासाठी चक्क भारताची निवड केली आहे. जोधपूरमध्ये हे प्रसिद्ध जोडपं सप्तपदी घेणार आहेत. त्यांच्या लग्नाला बॉलिवूड आणि हॉलिवूडमधील दिग्गज उपस्थिती लावणार आहेत. विवाहासाठी ताज ग्रुपच्या हॉटेल उम्मेद भवन पॅलेसमध्ये बुकींग करण्यात आली आहे.

लिज-अरुण यांचे लग्न आणि ब्रिटीश सुपरमॉडेल नाओमी कॅम्पबेलचा बॉयफ्रेंड व्लादिमीर याच्या बर्थ डे पार्टी नंतर हॉलिवूडच्या या चर्चित जोडप्याचा विवाहसोहळा सूर्यनगरीत संपन्न होणार आहे. 2005 साली 6 मुलांना दत्तक घेतल्यापासून हे दोघे विवाहबंधनात अडकले नव्हते.

वैदिक पद्धतीने होणार विवाह
ब्रॅड आणि अँजेलिनाने वैदिक पद्धतीने विवाह करण्याचे ठरवले आहे. यासाठी राजस्थानमधील प्रसिद्ध पंडितांशी त्यांचे बोलणे झाले आहे. विवाह आयोजनसाठी परदेशी इवेंट कंपनीचे काही लोक मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जोधपूरमध्ये आले होते.