Home »Hollywood» British Singer Adele Wants Second Baby Before Turning 30

या फेमस सिंगरला वयाच्या तिशीपूर्वी व्हायचे आहे प्रेग्नेंट, जाणून घ्या काय आहे कारण

दिव्य मराठी वेब टीम | Sep 02, 2017, 15:50 PM IST

एंटरटेन्मेंट डेस्कः सेलेब्रिटींची प्रत्येक गोष्ट हटके असते. त्यांच्या प्रत्येक गोष्टीची नेहमीच चर्चा रंगते. असेच काहीसे घडले आहे प्रसिद्ध गायिका अडेल हिच्याविषयी. ब्रिटिश गायिका अडेलला वयाच्या तिशीपूर्वी प्रेग्नेंट व्हायची इच्छा आहे. पुढील वर्षी अडेल 30 वर्षांची होणार आहे.

अडेलचे लग्न झाले असून ती एका चार वर्षांच्या मुलाची आई आहे. अडेलला आता वयाच्या तिशीपूर्वी दुस-यांदा गरोदर व्हायचे आहे. साइनम कोनेकी हे तिच्या पतीचे नाव असून एंजेलो हे तिच्या चार वर्षांच्या मुलाचे नाव आहे.

अडेलने तिच्या मित्रांना सांगितले, की पुढील वर्षी म्हणजे 5 मे 2018 रोजी ती 30 वर्षांची होणार आहे. पण यानिमित्ताने मोठे सेलिब्रेशन करायची आवश्यकता नाही. कारण ती त्या काळात प्रेग्नेंट असल्याची शक्यता असणार आहे.

डेली स्टार वृत्तपत्राला अडेलच्या एका मित्राने सांगितल्यानुसार, “अडेलने तिच्या मित्रांना सांगितले, की एंजेलोला आता बहीण किंवा भाऊ हवा आहे. पुढीलवर्षी वाढदिवशी तिला मोठे सेलिब्रेशन नकोय. नातेवाईक आणि जवळच्या मित्रांसोबतच ती तिचा 30 वा वाढदिवस साजरा करणार आहे.”
अडेलने वयाच्या चौथ्या वर्षीपासून गायनाला सुरवात केली. अभ्यासापेक्षा तिचे मन जास्त गायनातच रमले. 2008 साली तिचा 19 हा अल्बम रिलीज झाला होता. या अल्बममुळे ती स्टार बनली. 51 व्या ग्रॅमी अॅवार्ड्समध्ये तिला बेस्ट न्यू आर्टिस्ट आणि बेस्ट फीमेल पॉप वोकल परफॉर्मन्स कॅटगरीत अवॉर्ड मिळाला होता. याशिवाय तिला रेकॉर्ड ऑफ द ईयर आणि साँग ऑफ द ईयर कॅटगरीत नामांकन प्राप्त झाले होते. अडेलच्या 2012 साली प्रकाशित झालेल्या 21 या अल्बमने अनेक रेकॉर्ड्स प्रस्थापित केले होते. अडेलने आतापर्यंत सहा वेळा ग्रॅमी अवॉर्ड आपल्या नावी केले आहेत.

Next Article

Recommended