आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘मॅक्सिम हॉट 100 वुमन्स’च्या यादीत टॉपवर आहे ही मॉडेल, पाहा खास PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- दक्षिण आफ्रिकेची मॉडेल कँडिस स्वॉनपॉल)
'मॅक्सिम 2014 हॉट 100'च्या यादीत दक्षिण आफ्रिकेची 25 वर्षीय मॉडेल कँडिस स्वॉनपॉलने पहिले स्थान पटकावले आहे. काही दिवसांपूर्वी न्यूयॉर्कच्या मॅक्झिम या प्रसिद्ध मॅगझिनने ही यादी जाहीर केली आहे. वोटिंगद्वारे टॉप 100ची यादी जाहीर करण्यात आली आहे.
कँडीस सुंदर आणि ग्लॅमरस असण्यासोबतच जगातील सर्वाधिक कमाई करणा-या मॉडेल्सपैकी एक आहे. वयाच्या 15व्या वर्षी मॉडेलिंगला सुरुवात करणा-या कँडिसने अल्पावधीतच अनेक प्रतिष्ठित मॅगझिन्सच्या कव्हरपेजवर स्थान पटकावले आहे.
2012 मध्ये फोर्ब्स मॅगझिनच्या सर्वाधिक कमाई करणा-या मॉडेल्सच्या यादीत कँडिस दहाव्या क्रमांकावर होती. मॅक्सिमच्या सर्वेक्षणानुसार, 2010-11 या काळात तिची कमाई 3 मिलियन डॉलर्स (जवळपास 180 कोटी रुपये) होती. तर 2013 मध्ये फोर्ब्सच्या यादीत ती नवव्या स्थानावर होती. यावर्षी तिची कमाई 3.3 मिलियन डॉलर्स (जवळपास 198 कोटी रुपेय) इतकी होती.
व्होग, जीक्यू, एली या आंतरराष्ट्रीय मॅगझिनच्या कव्हरपेजवरसुद्धा कँडिस झळकली आहे. अनेक फॅशन डिझायनर्सची कँडिस पहिली पसंत आहे.
‘मॅक्सिम हॉट 100’ वुमन्सच्या यादीत या आहेत टॉप 10
1. कँडिस स्वॉनपॉल, साउथ आफ्रिकन मॉडेल
2. स्कारलेट जॉनसन, अमेरिकन मॉडेल, अभिनेत्री आणि गायिका
3. कॅटी पेरी, अमेरिकन अभिनेत्री, गायिका आणि गीतकार
4. इरीना शायक, रशियन मॉडेल
5. जेनिफर लॉरेन्स, अमेरिकन अभिनेत्री
6. जूई डेशचेनल, अमेरिकन अभिनेत्री, गायिका, संगीतकार
7. एलसेन्ड्रा एम्ब्रोसिओ, ब्राझीलियन मॉडेल
8. जेसिका एल्बा, अमेरिकन मॉडेल आणि अभिनेत्री
9. मिला क्यूनिस, अमेरिकन अभिनेत्री
10. कारा डेलिविंगनी, ब्रिटिश फॅशन मॉडेल
पुढील स्लाईड्समध्ये पाहा टॉप मॉडेल कँडिसची निवडक छायाचित्रे...