आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कान फिल्म फेस्टिव्हलमधील किसमुळे इराणमध्ये वाद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये इराणी अभिनेत्री लैला हातमी यांनी कान फिल्म फेस्टिव्हलचे अध्यक्ष जाइल्स जॅकेब यांच्या गालावर किस केल्याचा वाद वाढतच जात आहे. जॅकब यांनी सांगितले, की हा पाश्चिमात्य संस्कृतीमधील एक शिष्टाचार आहे. परंतु इराणी माध्यम हा महिलांचा अपमान असल्याचे सांगत आहेत.
जॅकेब यांनी आपल्या टि्वटमध्ये सांगितले, 'मी मिसेस हातमी यांच्या गालावर किस केले होते. त्यावेळी त्या केवळ हातमी नव्हत्या तर संपूर्ण इराणी सिनेमांच्या प्रतिनिधी होत्या.'
या प्रकरणावर चालू असलेल्या वादावर जॅकेब यांनी सांगितले, की पाश्चिमात्य संस्कृतीत हा एक शिष्टाचार आहे. म्हणून कोणताही वाद होऊ नये.
इराणचे सांस्कृतिक मंत्री होस्ना नौशाबादी यांनी सांगितले, की कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये हातमी यांची उपस्थिती धार्मिक विचारांचे उल्लंघन होते.
हातमी जगभरात आहे चर्चेत
सिनेमाची पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबात जन्मलेल्या हातमी, असगर फरहादीच्या 'ए सेपरेशन' सिनेमामधील भूमिकेमुळे जगभरात चर्चेत आल्या होत्या. या सिनेमाला 2012मध्ये परदेशी भाषेच्या सिनेमा श्रेणीमध्ये अ‍ॅकॅडमी अवॉर्ड मिळाला होता. हातमी त्यांचे पती अभिनेता अली मोसाफासह इराणमध्ये वास्तव्याला आहेत.
बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस मिडल ईस्टचे एडिटर सेबेलस्टियन उशर यांच्या सांगण्यानुसार, हातमी यांनी डोक्याला रुमाल गुंडाळलेला होता. परंतु त्यांचा गळा झाकलेले नव्हते. त्यामुळे अशी वेशभूषा आणि त्यांचे किस इराणींच्या मुस्लिम विचारांच्या विरुध्द होते. ही वागणूक इराणी परंपरा स्वीकारणार नाही.