आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहेत ती खास छायाचित्रे ज्यासाठी सेलिब्रिटींना मिळाले कोट्यवधी रुपये

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एक छायाचित्र हजार शब्द सांगून जात असतं. मग ते छायाचित्र जर एखाद्या सेलिब्रिटीचे असेल तर मग त्याला अधिक महत्त्व दिलं जातं. अशाच काही छायचित्रांसाठी प्रसिद्ध मॅगझिन्स सेलिब्रिटींना कोट्यवधी रुपये देत असतात.
हॉलिवूड स्टार ब्रॅड पिट आणि अँजेलिना जोली या जोडीने 2006 मध्ये जन्मलेली त्यांची मुलगी शिलोह नाउवेलचे वरील छायाचित्र पीपुल मॅगझिनला तब्बल 41 लाख डॉलर (त्याकाळी 18 कोटी रुपये)मध्ये विकले होते. याशिवाय हेच छायाचित्र 'हॅलो!' या मॅगझिनने त्यांच्याकडून 35 लाख डॉलर (म्हणजेच 15 कोटी)ला खरेदी केले होते.
या छायाचित्राचे हक्क विकताना ब्रॅड पिटने अट घातली होती, की पीपुल मॅगझिनने हे छायचित्र केवळ त्यांच्या प्रमोशन एडिशन कव्हरपेजवरच प्रकाशित करावे. याशिवाय छायाचित्राच्या चारही बाजू स्पष्ट दिसायला हव्या.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला सेलेब्सची अशीच काही छायाचित्रे दाखवत आहोत, ज्यासाठी त्यांना कोट्यवधी रुपये मिळाले...