आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चुकीच्या प्लास्टिक सर्जरीने बिघडला CELEBS चा चेहरा, दिसू लागले विचित्र

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अमेरिकन रिअॅलिटी शो स्टार आणि म्यूजिशियन फराह अब्राहम)
ग्लॅमरस इंडस्ट्रीतील अभिनेत्री आणि मॉडेल अधिक सुदंर दिसण्यासाठी प्लास्टिक सर्जरीची मदत घेत असतात. मात्र अनेकदा या प्लास्टिक सर्जरीच्या उलटाच परिणाम त्यांच्या चेह-यावर दिसू लागतो. असचे काही झाले आहे, अमेरिकन रिअॅलिटी शो स्टार आणि संगीतकार फराह अब्राहमसोब0त. 24 वर्षीय फराहने आपल्या ओठांची प्लास्टिक सर्जरी केली होती. मात्र सर्जरीनंतर तिच्या ओठांचे आकार इतका बिघडला, की तिचे ओठ विचित्र दिसू लागले. सूत्रांच्या मते, फराह पुन्हा एकदा ओठांची सर्जरी करण्याच्या विचारात आहे. मात्र डॉक्टरांनी तिला सर्जरी न करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे तिचा फेस डॅमेज होण्याची शक्यात आहे.
फरहाने 2009 मध्ये सर्वप्रथम आपल्या नाकावर शस्त्रक्रिया करुन घेतली होती. त्यानंतर ओठांचा शेप बदलण्याचा तिने निर्णय घेतला. त्यासाठी ओठांवर बरेचदा इंजेक्शन घेतले. मात्र तिला मनासारखा रिझल्ट मिळाला नाही. ओठांवरील शस्त्रक्रियेपूर्वी तिला अॅनेस्थेशिया देण्यात आला होता. त्याचा परिणाम असा झाला, की तिचे ओठ खूप सुजले.
फराहच नव्हे तर हॉलिवूडमध्ये असे अनेक सेलेब्स आहेत, ज्यांनी सुंदर दिसण्यासाठी प्लास्टिक सर्जरी केली खरी, मात्र त्या सुंदर दिसण्याऐवजी आणखीनच कुरुप दिसू लागल्या.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या, अशाच आणखी काही सेलेब्सविषयी...