आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Charlie Sheen Did Not Tell About His HIV To Girlfriends

2 वर्षांत 200 महिलांसोबत ठेवले शारीरिक संबंध, HIVविषयी अज्ञात होत्या गर्लफ्रेंड्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चार्ली शीन ब्री ओल्सन (उजवीकडे) आणि नताली केन्लीसोबत
हॉलिवूड अभिनेता चार्ली शीनने अलीकडेच खुलासा केला आहे, की तो एचआयव्ही पॉझिटीव्ह आहे. हा खुलासा त्याने एनबीसी नेटवर्कच्या एका लाइव्ह शोमध्ये केला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मागील दोन वर्षांत चार्लीचे तब्बल 200 महिलांसोबत संबंध होते. परंतु त्याने कधीच त्याच्या आजाराविषयी त्यांना सांगितले नाही. चार्लीच्या खुलासाने त्याच्या अनेक एक्स आणि सध्याच्या गर्लफ्रेंड्स नाराज आहेत.
इंग्रजी न्यूज 'द डेली कॉलर'मध्ये छापलेल्या बातमीनुसार, पोर्न अभिनेत्री ब्री ओल्सन आणि नताली केन्ली 2011मध्ये शीनसोबत त्याच्या लॉस एंजिलिस स्थित घरी राहत होत्या. शीन दोघींनी गॉडेसेस नावाने हाक मारायचा. दोघींनी म्हणाल्या, की शीनने त्यांना कधीच HIV ग्रस्त असल्याचे सांगितले नाही. शीनने एकदा सांगितले होते, की त्याला रात्री घाम येतो आणि डोकेही दुखते. याविषयी ओल्सनने मंगळवारी (17 नोव्हेंबर) एका मुलाखतीत सांगितले.
तिने सांगितले, 'मला आठवते, की तो मध्यरात्री उठायचा आणि या आजाराच्या लक्षणाविषयी तक्रार करत होता.' तसेच केन्लीच्या सांगण्यानुसार, शीनच्या उपचारासाठी डॉक्टर्स येत होते आणि त्याच्यावर बंद खोलीत उपचार होत होते. ओल्सन आणि केन्लीशिवाय इतर 6 महिलांनी शीनच्या विरोधात तक्रार दाखल करण्याची तयार केली आहे. त्यांच्या सांगण्यानुसार, शीनने त्यांच्यासोबत असुरक्षित शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
कोण आहे चार्ली शीन?
- चार्ली शीन टीव्ही सीरिज 'टू अँड ए हॉफ मॅन'मधून लोकप्रिय झाला.
- 2011मध्ये त्याला या टॉप रेटेड टीव्ही शोमधून बाहेर करण्यात आले होते. त्याच्यावर वॉरेन ब्रदर्ससोबत गैरवर्तन केल्याचा आरोप लावला होता.
- शीन फिल्म स्टार मार्टिन शीनचा मुलगा आहे. 1986मध्ये आलेल्या त्याचे दोन सिनेमे 'प्लाटून' आणि 'फेरिस बूएलर्स डे ऑफ' हिट झाले होते.
शीनने लाइव्ह शोमध्ये काय खुलासा केला?
>>शीन म्हणाला, माझ्या या आजाराविषयी मला चार वर्षांपूर्वी कळले.
>>जेव्हा सुरुवातीच्या काळात मी खूप आजारी पडलो, तेव्हा मला असह्य वेदना झाल्या. मला वाटले, कदाचित मला ब्रेन ट्युमर झाला असावा.
>>त्याने पुढे सांगितले, अनेक तपासण्या केल्यानंतर डॉक्टरांनी मला सांगितले, की मला एड्सचा व्हायरस आहे.
>>माझ्यासाठी हे तीन शब्द ऐकणे खूप कठीण होते. हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉईंट होता.
>>शीन म्हणाला, गेल्या काही वर्षांपासून लोकांनी माझ्या या आजाराविषयी बोलू नये, यासाठी मी त्यांना पैसे देत होतो. हे तेच लोक आहेत, ज्यांच्यावर माझा खूप विश्वास होता. आज मी माझ्या आजाराविषयी कबुली देऊन स्वतःला यातून मुक्त केले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या चार्ली शीनच्या आतापर्यंतच्या आयुष्यातील EX-गर्लफ्रेंड्सविषयी...