आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Charlie Sheen Says I Am Here To Admit That I Am In Fact HIV Positive

TV शोमध्ये या सुपरस्टारची कबुली, \'होय मी HIV पॉझिटीव्ह, मित्रांनी केलंय ब्लॅकमेल\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटोः चार्ली शीन - Divya Marathi
फाइल फोटोः चार्ली शीन
न्यूयॉर्कः प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता चार्ली शीनने आपण एचआयव्ही पॉझिटीव्ह असल्याचे एका मूलाखतीत जाहीर केले आहे. एनबीसी टूडेला दिलेल्या मुलाखतीत त्याने हा धक्कादायक खुलासा केला आहे. चार्लीच्या गौप्यस्फोटामुळे हॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. 50 वर्षीय चार्ली शीनने चार वर्षांपूर्वी एचआयव्ही टेस्ट केली होती. या टेस्टमध्ये एड्सचे विषाणू आढळ्याची माहिती त्याने दिली. शीनने सांगितले, ''जेव्हा मी माझ्या आजाराविषयी मित्रांना सांगितले, तेव्हा त्यांनी मला ब्लॅकमेल करणे सुरु केले. त्यांनी ही गोष्ट इतर कुणाला सांगू नये, यासाठी मी त्यांना पैसे द्यायचो.''
मागील काही वर्षांत औषध आणि अल्कोहोलच्या वापरामुळे शीनच्या व्यक्तिगत आणि व्यावसायिक आयुष्यावर परिणाम झाला होता. तब्बल 50 हजार डॉलरपेक्षा अधिक रक्कम चार्ली एका बाईवर खर्च करत असल्याचेही यात सांगण्यात आले. दरम्यान स्वतःच एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचा खुलासा केल्याने चार्ली सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. अनेक महिलांशी असलेल्या संबंधांमुळे चार्ली शीन चर्चेत होता. जाहीर मुलाखतींमधूनही चार्लीने आपण काही हजार महिलांशी शरीरसंबंध ठेवल्याचे म्हटले होते.
पुढील स्लाईड्समध्ये वाचा, कोण आहे चार्ली शीन आणि लाइव्ह शोमध्ये त्याने काय म्हटले...