आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'xXx 4'मध्ये विन डीजलबरोबर पुन्हा स्क्रीन शेयर करणार दीपिका पदुकोण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - दीपिका पदुकोणच्या फॅन्ससाठी आणखी एक खउशखबर आहे. xXx 4 मध्येही दीपिका महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. डायरेक्टर डी.जे. कॅरूसो यांनी ट्विटरवर फॅन्सना ही माहिती दिली. या ट्वीटनंतर या सिक्वलमध्ये दीपिकाशिवाय आणखी कोणकोणते स्टार्स झळकणार आहेत, हे काही फॅन्सनी विचारले. त्यावर त्यांनी यात सगळेच असणार आहेत, असे उत्तर दिले. म्हणजेच या सिक्वलमध्ये रूबी रोझ, विन डीजल, नीना दोब्रेव्ह आणि दीपिका हे सगळेच पुन्हा एकदा टीम-अप होणार आहेत. 

डीजे कारुसोच्या दिग्दर्शनात तयार झालेला 'xXx: Return of Xander Cage' मध्ये  दीपिका आणि विन डीजल यांची केमिस्ट्री फॅन्सना आवडली होती. एवढेच नाही तर त्यांची ऑफ-स्क्रीन केमिस्ट्रीही चांगली असल्याचे समोर आले होते. दीपिकाने याच चित्रपटातून हॉलिवूड डेब्यू केला होता. 
 
पुढील स्लाइड्सवर, पाहा कसा होता xXxचित्रपटात दीपिकाचा अंदाज...