आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेनिअल रेडक्लिफ 'व्हॉट्स ऑन स्टेज 2014' पुरस्काराने सन्मानित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हॅरी पॉटर फेम डेनिअल रेडक्लिफ आणि अभिनेता रुपर्ट ग्रिंटला 2014च्या 'व्हॉट्स ऑन स्टेज' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. लंडनच्या प्रिन्स ऑफ वेल्स थिएटरमध्ये आयोजित या सन्मान सोहळ्यात रेडक्लिफ त्याच्या अलगोरच्या भूमिकेत अर्थातच मोठ्या केसांच्या लूकमध्ये दिसला.
हा पुरस्कार रेडक्लिफने 'द क्रिपल ऑफ इनिशमान'मध्ये साकारलेल्या भूमिकेसाठी त्याला देण्यात आला आहे. रेडक्लिफ माहणतो, की हा सन्मान त्याच्यासाठी प्रोत्साहन करणारा आहे आणि नवीन उर्जा देणारा आहे. रेडक्लिफला त्याच्या लाखो चाहत्यांनी या पुरस्कारासाठी टि्वटरवर शुभेच्छा दिल्या आहेत.