आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

20 PHOTOS : पाहा कसा-कसा बदलत गेला होता मायकल जॅक्सनचा चेहरा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- पॉप स्टार मायकल जॅक्सन)
एन्टरटेन्मेंट डेस्कः पॉप स्टार या शीर्षकाला सर्वाधिक प्रसिद्धी ही मायकल जॅक्सनने मिळवून दिली. 'किंग ऑफ पॉप' या नावाने जागतिक किर्ती प्राप्त करणा-या या पॉप स्टारला जगाचा निरोप घेऊन सहा वर्षे उलटून गेली आहेत. 25 जून 2009 रोजी मायकल आपल्या घरात मृतावस्थेत आढळला होता. सिंगिंग आणि डान्सव्यतिरिक्त ज्यासाठी मायकल नेहमी लक्षात राहिल, ती गोष्ट म्हणजे त्याचा बदलणारा चेहरा.
1987 मध्ये बँड अल्बम आल्यानंतर मायकलच्या लोकप्रियतेत भर पडली. मात्र याच काळात त्याने प्लास्टिक सर्जरी करुन घेतल्याचीही चर्चा झाली. त्याचा नवीन लूक बघण्याच्या उत्सुकतेपोटी त्याच्या अल्बमच्या तीन कोटी प्रती विकल्या गेल्या होत्या. अनेकदा चेह-यात बदल करुनसुद्धा मायकलने प्लास्टिक सर्जरी केल्याचे कधीही मान्य केले नाही.
बालपणीपासून ते आयुष्याच्या शेवटच्या काळात मायकल जॅक्सनच्या चेह-यात किती बदल झाला होता, हे तुम्ही पुढील स्लाईड्समध्ये बघू शकता...