आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँड-बाजासोबत अस्सल मराठमोळ्या थाटात दीपिकाने केले हॉलिवूड स्टार विन डीजलचे वेलकम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः हॉलिवूड स्टार विन डीजलचे गुरुवारी सकाळी सातच्या सुमारास मुंबईत आगमन झाले. अभिनेत्री दीपिका पदुकोणने अस्सल मराठमोळ्या थाटात एअरपोर्टवर विन डीजलचे स्वागत केले. गुरुवारी रात्री मुंबईत डीजल आणि दीपिका स्टारर ‘xXx- द रिटर्न ऑफ झेंडर केज’ या सिनेमाचा प्रीमिअर होणारेय. हा सिनेमा 14 जानेवारी रोजी भारतात आणि 20 जानेवारी रोजी वर्ल्डवाइड रिलीज होईल. 

टिळा लावत असताना विन डीजलने विचारले हे काय...? 
- विनचे मुंबईत आगमन होताच पारंपारिक महाराष्ट्रीयन वेशभूषा परिधान केलेल्या अनेक महिलांनी मोठ्या उत्साहाने विनचे मराठमोळ्या पद्धतीने स्वागत केले. दीपिका आणि विन यावेळी मोठ्या आनंदात दिसत होते. 
- महाराष्ट्रीयन वेशभूषा परिधान केलेल्या महिलांनी टिळा लावून आणि आरती ओवाळून विनचे स्वागत केले. यावेळी हे काय आहे... असा प्रश्न विनने दीपिकाला विचारला.
- तेव्हा टीळा लावणे हिंदू संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग असल्याचे दीपिकाने विनला सांगितले. 
 
दीपिका होस्ट करणार पार्टी... 
- दीपिका, विन आणि ‘xXx- द रिटर्न ऑफ झेंडर केज’ या चित्रपटाचे दिग्दर्शक डीजे करुसो एका पत्रकार परिषदेत पत्रकारांना संबोधित करतील. - त्यानंतर लोअर परेल, मुंबई येथील फिनिक्स मिल्समध्ये दीपिका आणि विन चाहत्यांशी संवाद साधणार आहेत. 
- विनच्या या दौऱ्यादरम्यानच या सिनेमाचा ग्रॅण्ड प्रिमिअरही पार पडणार आहे. 
- बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींची भेट घेण्यासोबतच इतरही बहुविध कार्यक्रमांनी विन डिझेल या दौऱ्यादरम्यान व्यग्र असणार आहे. 
- विन डीजल यांच्या सन्मानार्थ दीपिका एक पार्टी होस्ट करणार असून त्यामध्ये बॉलिवूड कलाकार हजेरी लावणार आहेत. 

दीपिकाचा पहिला हॉलिवूड सिनेमा...
- ‘xXx- द रिटर्न ऑफ झेंडर केज’ हा दीपिका पदुकोणचा पहिला हॉलिवूड सिनेमा आहे. 
- बातम्यांनुसार, तिने या सिनेमात शिकारी आणि प्रेयसीची भूमिका वठवली आहे.
- दीपिका आणि विन यांच्यासह फेमस हॉलिवूड अॅक्ट्रेस नीना डोबरेव आणि रुबी रोज यांच्याही मुख्य भूमिका या सिनेमात आहेत. 
- विन डीजल एनएसए एजेंटच्या भूमिकेत आहे.
 
पुढे पाहा, संबंधित व्हिडिओ आणि फोटोज...