आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'XXX...'च्या प्रीमिअरला गोल्डन गाऊनमध्ये दिसला दीपिकाचा सेक्सी अंदाज, बघा Photos

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुरुवारी रात्री मुंबईत बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणचा पहिला हॉलिवूड सिनेमा 'ट्रिपल एक्स : रिटर्न ऑफ द जेंडर केज'चा शानदार प्रीमिअर सोहळा पार पडला. यावेळी सिनेमात दीपिकासोबत मेन लीड साकारणारा हॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता विन डीजल उपस्थित होता. दीपिका पदुकोणने या खास दिवसासाठी गोल्डन गाऊनची निवड केली. या गाऊनमध्ये दीपिकाचा सिझलिंग आणि सेक्सी अंदाज लक्षवेधी ठरला. दीपिकाच्या या लूकची बरीच चर्चा होतेय. प्रसिद्ध फॅशन डिझायनर  नईम खानने दीपिकासाठी हा ड्रेस डिझाइन केला. 

दीपिका आणि विन डीजल स्टारर हा सिनेमा आज भारतीय बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला. या प्रीमिअरवेळी दीपिका आणि विन यांनी सिनेमाशी निगडीत त्यांचे  अनुभव शेअर केले. या सिनेमात  रूबी रोज, सॅमुएल एल जॅक्सन, डोनी येन आणि टोनी  यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. यापूर्वी लंडनमध्ये सिनेमाचा प्रीमिअर झाला होता. 

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा,  'ट्रिपल एक्स : रिटर्न ऑफ द जेंडर केज' या सिनेमाच्या प्रीमिअर सोहळ्यातील दीपिकाचा दिलखेचक अंदाज दाखवणारी खास छायाचित्रे...