Home »Hollywood» Demi Lovato Birthday Special, Demi Lovato Home Los Angeles California

5,546 स्क्वेयर फुट 53 कोटींच्या बंगल्यात राहते ही गायिका, झाला होता चोरीचा प्रयत्न

दिव्य मराठी वेब टीम | Aug 20, 2017, 12:34 PM IST

वर्ल्ड फेमस गायिका डेमी लोवेटो आज तिचा 25 वा वाढदिवस साजरा करत आहे. चाईल्ड आर्टीस्ट म्हणून 'Barney & Friends' मधून डेब्यू करणारी डेमी लॉस एंजिलिस कॅलिफोर्निया येथे राहते. तिच्या तीन मजली घरात 4 बेडरुम आणि 5 बेडरुम आहेत. 5,546 स्क्वेयर फुटमध्ये पसरलेल्या घराची किंमत 53 कोटी रुपये आहे. तिच्या या घरात एकदा चोरांनी घुसण्याचा प्रयत्न केला होता. 2016 मध्ये खरेदी केले होते घर..
गायिका डेमीने हे घर सप्टेंबर 2016 साली खरेदी केले होते. डेमीचे हे घर आतून खूप सुंदर आहे. यात लिव्हींग रुमपासून बेडरुमपर्यंत सर्वच गोष्टी खूप सुंदर पद्धतीने सजविलेले आहेत. बऱ्याचशा रुम्समध्ये ग्लास वॉल आहेत. प्रत्.येक रुमला मोठ्यामोठ्या खिडक्या आहेत.
याशिवाय बार, आऊटडोर स्वीमींग पुल आणि गार्डनही आहे.
यावर्षी जानेवारीमध्ये झालेल्या पावसामुळे डेमीला हे घर सोडून दुसरीकडे जावे लागले. तिचे हे घर हॉलिवूड हिल्सवर आहे आणि पावसामुळे घरात पहाडांवरील माती घुसली होती. नंतर सफाई झाल्यानंतर पुन्हा डेमी येथे राहण्यास आली होती तेव्हा चोरांनी घरात कोणी नाही असे समजून चोरीचा प्रयत्न केला होता. पण घरातील कुत्र्यांमुळे चोरी टळली. जेव्हा चोरांनी घरात शिरण्याचा प्रयत्न केला तेव्हा डेमी शहराबाहेर होती आणि तिच्या नवीन गाण्याचे प्रमोशन करण्यात बिझी होती.
पुढच्या स्लाईडवर वाचा, डेमीचे हॉलिवूड हिल्सवरील घराचे काही PHOTOS...

Next Article

Recommended