कोलंबिया- टॉम क्रूजच्या 'MENA' या आगामी सिनेमाच्या सेटवर दोन क्रू मेंबर्स प्लेन क्रॅशमध्ये मृत्यूमुखी झाले. एलन पुरविन आणि कोलंबियाचा कार्लोस बर्ल नावाचे हे दोन पायलट त्यावेळी या अपघाताचे शिकार झाले. खराब वातावरणामुळे त्यांचे प्लेन कोलंबियाच्या मेडेलिन शहरात कोसळले.
बोर्डवर उपस्थित थर्ड मॅन पायलट जिमी लीला गंभीर परिस्थितीत हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. बातमी आहे, की प्रशिक्षित पायलट टॉम या दुर्घटनेत सामील नव्हते. त्यांनी या घटनेच्या एक दिवसापूर्वी आपले शूट पूर्ण केले होते.
फिल्म कंपनी यूनिव्हर्सल पिक्चर्सच्या प्रवक्त्याने आपल्या जबाबात सांगितले, 'क्रू मेंबर्सचे एक एअरक्राफ्ट एनरिक ओलाया हेरेरा हवाई अड्ड्यावर परताना त्याचा अपघात झाला. त्यामुळे दोन लोकांना मृत्यू झाला. या कठिण काळात आम्ही त्या क्रू मेंबर्स आणि त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहोत.'
‘MENA’ सिनेमात टॉम क्रूज एक यूएस पायलट आणि ड्रग ट्रॅफिकर बॅरी सीलची भूमिका साकारत आहे. हा सिनेमा जानेवारी 2017ला रिलीज होणार आहे.