आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन लग्नांनंतरही वयाच्या 48व्या वर्षी चौथ्या लग्नाच्या तयारीत लिझ, जाणून घ्या बरंच काही...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एलिझाबेथ हर्ले म्हणजेच लिझ हर्लेने किशोरवयातच डान्सर होण्याचा संकल्प केला होता. 12 व्या वर्षी लिझने बॅले क्लासमध्ये प्रवेश घेतला, पण ती लगेच परत आली. लिझ कॉलेजमध्ये असताना तिला लंडन स्टुडिओ सेंटरसाठी शिष्यवृत्ती मिळाली. तेथे नृत्य आणि अभिनय शिकवले जात होते . यानंतर लिझच्या डोक्यात फॅशनचे भूत शिरले. तिने आपले केस गुलाबी करून घेतले आणि नाकात नथ घालून फिरू लागली. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने रंगभूमीवर काम करायला सुरुवात केली. 1987 मध्ये तिला 'आरिया' या पहिल्या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. 1995 मध्ये लिझ एक मॉडेल झाली, तिने एका टीव्ही शोमध्ये सूत्रसंचालनदेखील केले. सर्वच क्षेत्रात प्रयत्न केल्यानंतर शेवट लिझला मॉडेलिंग आणि चित्रपटात तिला प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर तिने मागे वळून पाहिले नाही.
तसे पाहता लिझ हर्लेचे आयुष्य अनेक अनिश्चितेने भरलेले आहे. किशोरावस्थेतपासून तिचे लक्ष्य बदलत राहिले. तिचे आयुष्य अशाच वेगवेगळ्यांना घटनांनी गुरफटलेले असून लवकरच ती आपला जोडीदार शेन वॉर्नसोबत लग्न करणार असल्याची जोरदार चर्चा आहे.
बिनधास्त लिझ हर्लेच्या खासगी आयुष्याविषयी बरंच काही जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...