आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Elvis Presley's Bible Containing Handwritten Notes To Be Auctioned‎

एल्विस प्रेस्लीच्या बायबलचा लिलाव

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - रॉक अ‍ॅन्ड रोल संगीताचा अनभिषिक्त सम्राट एल्विस प्रिस्लेच्या 35 व्या स्मृतिदिनानिमित्त एल्विसने आपल्या हस्ताक्षरात टिपा लिहिलेल्या बायबलचा लिलाव आयोजित करण्यात आला आहे. 16 ऑगस्ट 1977 रोजी वयाच्या 42 व्या वर्षी हृदयविकाराने एल्विसचे निधन झाले होते. इंग्लंडमधील स्टॉकपोर्ट येथील ओमेगा ऑक्शन्स ही संस्था 8 सप्टेंबर रोजी एल्विसच्या शंभरावर वस्तूंचा लिलाव करणार असून यात या बायबलचाही समावेश आहे. 1957 मध्ये एल्विसला ख्रिसमसनिमित्त त्याचे काका वेस्टर आणि काकू क्लेटीस यांनी हे बायबल भेट दिले होते. यातील 1600 पानांवर एल्विसने असंख्य टिपा लिहिल्या आहेत.