आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Cannes 2017: डिझायनर आउटफिट्समध्ये दिसला सोनमचा लक्ष वेधून घेणारा स्टनिंग लूक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडून-  अबु जानी-संदीप खोसला, अनामिका खन्ना आणि मसाबा गुप्ता यांच्या डिझायनर ड्रेसमध्ये सोनम - Divya Marathi
डावीकडून- अबु जानी-संदीप खोसला, अनामिका खन्ना आणि मसाबा गुप्ता यांच्या डिझायनर ड्रेसमध्ये सोनम
कानः फ्रान्समध्ये सुरु असलेल्या 70 व्या कान फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर अभिनेत्री सोनम कपूर अवतरताच सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळून राहिल्या. यावेळी सोनमने एली साबचा लाइट पिंक कलरचा ड्रेस परिधान केला होता. यामध्ये ती अतिशय सुंदर दिसली. त्यापूर्वी सोनम अबु जानी आणि संदीप खोसला यांनी डिझाइन केलेल्या व्हाइट अँड ब्लू कलरच्या गाऊनमध्ये दिसली. 

त्यानंतर सोनम पुन्हा एकदा वेगळ्या आउटफिटमध्ये फ्रेंच रिवेरावर अवतरली. यावेळी तिने अनामिका खन्ना यांनी डिझाइन केलेला ड्रेस परिधान केला होता. तिने रेट्रो पिन-अप स्टाइलमध्ये डोक्यावर रेड कलरचा बंडाना रॅप केला होता. शिवाय मसाबा गुप्ताने डिझाइन केलेला ड्रेससुद्धा सोनमने यावेळी परिधान केला होता.   

लॉरियल पेरिस इंडियाने सोनमचे काही फोटोज ट्विट केले असून त्याला कॅप्शन दिले, "@sonamakapoor goes minimalist with her eyes in Super Liner Black Lacquer, La Palette Gold & Superstar Mascara #LifeAtCannes #SonamAtCannes." 

पुढील स्लाईड्सवर बघा, सोनमचे लक्ष वेधून घेणारे फोटोज.. 
बातम्या आणखी आहेत...