आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Fifty Shades Of Grey Is Interesting Plot Of Romance Violence

फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे, प्रणय हिंसाचाराचे रंजक कथानक...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रणयावर आधारित उत्तेजक कादंबरी फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे वर निर्मित चित्रपट यंदाचा बहुप्रतीक्षित चित्रपट मानले जात आहे. १३ फेब्रुवारीला व्हॅलेंटाइन डेला रिलीज होणाऱ्या चित्रपटाच्या ऑनलाइन टिकट प्रचंड विकले जात आहेत. पहिल्या आठवड्यात बॉक्सऑफिसवर ४.५० कोटी डॉलरचे उत्पन्न अपेक्षित आहे. चित्रपटासंबंधी इंटरनेटवर आलेल्या माहितीने अपेक्षा वाढल्या आहेत.
ईएल जेम्स या टोपण नावाने लिहिण्यात आलेल्या कादंबरीच्या मूळ लेखिका एरिका लियोनॉर्ड आहेत. तीन टप्प्यांत लिहिलेल्या पुस्तकाच्या विक्रीच्या बाबतीत हॅरी पॉटर मालिकाही मागे टाकली. त्याच्या दहा कोटी प्रती विकल्या गेल्या आहेत. कथेनुसार एक युवती अनास्तेसिया स्टील (डकोटा जॉन्सन) एक सुंदर अब्जाधीश क्रिश्चन ग्रे (जेमी डोरनन) च्या प्रेमात पडते. अब्जाधीशाची अट असते की, तिला त्याची प्रत्येक गोष्ट ऐकावी लागेल, नाही तर तो तिला शिक्षा देईल. कादंबरीत रोमांटिक दृश्यांची रेलचेल आहे.
कॅथोलिक ख्रिस्तीं, महिला हक्कांशी संबंधित कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध केला. चित्रपटाला आर रेटिंग देण्यावरून अमेरिकेत टीका होत आहे. ब्रिटेनमध्ये १८ पेक्षा कमी वयाच्या व्यक्ती चित्रपट पाहू शकत नाहीत.उत्तर इंग्लंडमधील मॅनचेस्टरमध्ये शुक्रवारी आंतरराष्ट्रीय केक शो सुरू झाला. रोजी डमरने चर्चित कादंबरी ‘फिफ्टी-शेड्स ऑफ ग्रे’ चा अिभनेता क्रिश्चियन ग्रेच्या आकाराचा केक बनवला. नाव दिले - ‘फिफ्टी शेड्स ऑफ केक’.