(पत्नी के अमल अलामुद्दीनसोबत जॉर्ज क्लूनी)
व्हेनिस (इटली): हॉलिवूड अभिनेता जॉर्ज क्लूनी यांना अखेर
आपला परफेक्ट जोडीदार गवसला आहे. 53 वर्षीय जॉन यांनी शनिवारी मुळची लंडनची असलेल्या 36 वर्षीय अमल अलामुद्दीनसोबत लग्न केले. अमल लंडन बेस्ड ब्रिटिश लेबनीज लॉयर आहे. जॉर्ज क्लूनी यांची हॉलिवूडमधील फेमस बॅचलर्समध्ये गणना होत होती.
इटलीत झाले लग्नः
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जॉर्ज आणि अमल यांचा लग्नसोहळा इटलीतील व्हेनिस शहरात पार पडला. त्यांचे लग्न जॉर्जचे जवळचे मित्र आणि रोमचे माजी मेयर वाल्टर वेल्ट्रोनी यांनी लावून दिले. जॉर्ज यांचे हे दुसरे लग्न आहे. त्यांचे पहिले लग्न 1989 मध्ये अमेरिकन टीव्ही अभिनेत्री तालिया बल्समसोबत झाले होते. लग्नाच्या चार वर्षांतच दोघांचा घटस्फोट झाला होता.
कोण आहे जॉर्ज क्लूनीः
जॉर्ज क्लूनी अमेरिकन अभिनेता आहेत. त्यांना तीनदा हॉलिवूडच्या प्रसिद्ध गोल्डन ग्लोब अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे. याशिवाय त्यांना दोनदा अॅकॅडमी अवॉर्डसुद्धा मिळाला आहे. 'वन फाइन डे' (1996), 'थ्री किंग्स' (1999), 'ओसियंस इलेवन' (2001), 'फँटास्टिक मिस्टर परफेक्ट' (2009) आणि 'ग्रेविटी' (2013) हे त्यांचे गाजलेले हॉलिवूड सिनेमे आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा जॉर्ज क्लूनी आणि अमल अलामुद्दीन यांच्या लग्नात क्लिक झालेली खास छायाचित्रे...