आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Golden Globes: Lady Gaga's Coming Through. Leonardo, You're In The Way

#GoldenGlobes: लेडी गागाने मारताच लिओनार्डोची रिअॅक्शन झाली व्हायरल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लेडी गागाने कोपर मारताच लिओनार्डोच्या चेह-यावर अशी प्रतिक्रिया उमटली. - Divya Marathi
लेडी गागाने कोपर मारताच लिओनार्डोच्या चेह-यावर अशी प्रतिक्रिया उमटली.

लॉस एंजिलिसः सोशल मीडियावर सध्या लेडी गागा आणि लिओनार्डो डी केप्रिओचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत गागा लिओनार्डोला कोपर मारताना दिसत असून त्यावर लिओनार्डो विचित्र एक्सप्रेशन देताना दिसत आहे. हा व्हिडिओ लॉस एंजिलिसमध्ये पार पडलेल्या गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स सोहळ्यातील आहे. गागाला 'अमेरिकन हॉरर स्टोरी : होटल'साठी बेस्ट अॅक्ट्रेस इन पिक्चर (मेड फॉर टीव्ही) या अवॉर्डने सन्मानित करण्यात आले.
लिओनार्डोला तिस-यांदा मिळाला बेस्ट अॅक्टरचा अवॉर्ड

लिओनार्डो डी केप्रिओला द रेवेनेंट या सिनेमासाठी गोल्डन ग्लोबचा सर्वोत्कृष्ट अभिनेताच्या पुरस्कार मिळाला. 'एविएटर' आणि 'वुल्फ ऑफ वॉल स्ट्रीट' या सिनेमानंतर तिस-यांदा त्याला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या अवॉर्ड्सची घोषणा 10 जानेवारी (भारतीय वेळेनुसार 11 जानेवारी) ला सकाळी लॉस एंजिलिसमध्ये झाली.
जेनिफर लॉरेन्सला तिस-यांदा बेस्ट अॅक्ट्रेसचा गोल्डन ग्लोब अवॉर्ड

जेनिफर लॉरेन्सला कॉमेडी आणि म्युझिकल कॅटेगरीमध्ये 'जॉय' या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा अवॉर्ड मिळाला. यापूर्वी तिला 'सिल्व्हर लिनिंग्स प्लेबूक' (2012) आणि 'अमेरिकन हस्टल' (2013) या सिनेमांसाठी हा अवॉर्ड मिळाला होता.
'द रेवेनेंट'च्या वाट्याला आले सर्वाधिक पुरस्कार

'द रेवेनेंट'च्या वाट्याला गोल्डन ग्लोबचे सर्वाधिक अवॉर्ड्स आले. बेस्ट अॅक्टरसोबतच बेस्ट फिल्म (ड्रामा) आणि बेस्ट डायरेक्टरचा किताब या सिनेमाच्या नावी आहे.
कुणाला मिळाले अवॉर्ड्स...
सिनेमे
बेस्ट मोशन पिक्चर्स (ड्रामा) :
द रेवेनेंट
बेस्ट अॅक्ट्रेस (ड्रामा) : ब्री लार्सन (रूम)
बेस्ट पिक्चर (म्यूजिकल/ कॉमेडी) : द मार्टियन
बेस्ट अॅक्टर (म्यूजिकल/ कॉमेडी) : मॅट डॅमन : द मार्टियन
बेस्ट पिक्चर (एनिमेटेड) : इनसाइड आउट
बेस्ट पिक्चर (फॉरेन लँग्वेज) : सन ऑफ शाऊल
बेस्ट सपोर्टिंग अॅक्ट्रेस : कॅट विंसलेट (स्टीव जॉब्स)
बेस्ट सपोर्टिंग अॅक्टर : सिल्वेस्टर स्टेलोन (क्रीड)
बेस्ट स्क्रीन प्ले : आरोन सोर्किन (स्टीव जॉब्स)
बेस्ट ओरिजिनल स्कोअर : एनियो मोर्रिकोन (द हेटफुल एट)
बेस्ट ओरिजिनल सॉन्ग : राइटिंग ऑन द वॉल (स्पेक्टर)

टेलिव्हिजन
बेस्ट टीव्ही सीरीज (ड्रामा) :
मिस्टर रोबोट
बेस्ट टीव्ही अॅक्ट्रेस (ड्रामा) : ताराजी पी हेंसन (एम्पायर)
बेस्ट टीव्ही अॅक्टर (ड्रामा) : जॉन हॅम (मॅड मॅन)
बेस्ट टीव्ही सीरीज (म्युझिकल/कॉमेडी) : मोजार्ट इन द जंगल
बेस्ट टीव्ही अॅक्ट्रेस (म्यूजिकल/कॉमेडी) : रशेल ब्लूम (क्रेजी एक्स गर्लफ्रेंड)
बेस्ट टीवी एक्टर (म्युझिकल/कॉमेडी) : गेल गार्सिया बर्नल (मोजार्ट इन द जंगल)
बेस्ट पिक्चर (मेड फॉर टीव्ही) : वुल्फ हॉल
बेस्ट अॅक्ट्रेस इन पिक्चर (मेड फॉर टीव्ही) : लेडी गागा (अमेरिकन हॉरर स्टोरी : होटल)
बेस्ट अॅक्टर इन पिक्चर (मेड फॉर टीव्ही) : ऑस्कर इसाक (शो मी अ हीरो)
बेस्ट सपोर्टिंग अॅक्ट्रेस इन पिक्चर (मेड फॉर टीव्ही) : मौरा टियरनी ( द अफेयर)
बेस्ट सपोर्टिंग अॅक्टर इन पिक्चर (मेड फॉर टीव्ही) : क्रिश्चियन स्लाटर (मिस्टर रोबोट)
सेसिल बी. डीमिल अवॉर्ड : डेंजेल वाशिंगटन
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, फोटोज...