लॉस एंजिलिस- अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांची हॉलिवूड अभिनेत्री आणि गायिका ग्वानेथ पाल्ट्रोने 'यू आर सो हँडसम' म्हणून प्रशंसा केली. निमित्त होते, की पाल्ट्रोच्या लॉस एंजिलिस घरी ओयोजित एका फंडरेजर इव्हेंटचे. यावेळी पाल्ट्रो ओबामा यांची साथ मिळवून थोडी नर्व्हस झाली होती. त्यानंतर ती मायक्रोफोन ओबामा यांच्याकडे फिरवून म्हणाली, 'यू आर सो हँडसम'.
पाल्ट्रोने सांगितले, की ती ओबामांची मोठी चाहती आहे. त्यांची काम करण्याची पध्दत तिला खूप आवडते. हे ऐकून ओबामा यांनी चेह-यावर हलके हस्य फुलवले आणि थँक्स म्हणाले. महिलांच्या निगडीत मुद्यांवर आयोजित इव्हेंटमध्ये जवळपास 250 लोक सामील होते. त्यामध्ये अभिनेत्री जुलिया रोबर्ट आणि टीव्ही अभिनेता ब्रेडली व्हीटफोर्डनेसुध्दा उपस्थिती लावली होती.