आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'अॅँडी हार्डी' सिरीजसाठी प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेते मिकी रॉनी कालवश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेचे बॉय नेक्स्ट डोअर म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते मिकी रॉनी यांनी वयाच्या 93व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. बालकलाकार म्हणून आपल्या करिअरला सुरुवात करणारे मिकी 1926 ते 2014 याकाळात म्हणजचे तब्बल 88 वर्षे हॉलिवूडमध्ये कार्यरत होते. 'अॅँडी हार्डी' सिरीजसाठी त्यांना ओळखले जाते.
200हून अधिक सिनेमांत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणा-या मिकी यांना त्यांच्या कारकिर्दीत चार वेळा ऑस्करसाठी नामांकन मिळाले होते. वयाच्या 93व्या वर्षीदेखील त्यांचा उत्साह वाखाण्याजोगा होता. त्यांनी गेल्याच महिन्यात दिग्दर्शक शॉन लेव्ही यांच्या सिनेमाचे शुटिंग पूर्ण केले होते. त्यांच्या निधनाने हॉलिवूड जगतात शोककळा पसरली आहे.