आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The 57th Annual GRAMMY Awards, Hollywood Celebs On Red Carpet

Grammy Awards: रेड कार्पेटवर हॉलिवूड तारकांचा जलवा, ट्रान्सपरंट ड्रेसेसने वेधले लक्ष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(57 व्या ग्रॅमी अवॉर्ड्सच्या रेड कार्पेटवर अवतरलेल्या हॉलिवूड तारकांचा खास अंदाज)

लॉस एंजिलिसः जागतिक स्तरावर संगीत क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणा-या यंदाचा 57व्या ग्रॅमी पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्यात दोन भारतीयांनी मोहोर उमटवली. बंगळुरू स्थित संगीतकार रिकी केज व नीला वासवानी यांना "नव्या युगाचे गीत' या श्रेणीत सर्वोत्कृष्ट सन्मान मिळाला. रिकी यांच्या "विंड‌्स ऑफ संसारा' अल्बमला हा बहुमान मिळाला. वासवानी यांचा मुलांसाठीचा "आय अॅम मलाला' हा अल्बम सर्वोत्कृष्ट ठरला.
तर ब्रिटिश गायक सॅम स्मिथला 'स्टे विद मी' या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट गीत आणि वर्षाच्या सर्वोत्कृष्ट रेकॉर्डसह चार पुरस्कार मिळाले. 22 वर्षीय स्मिथला त्याच्या 'द लोनली ऑवर' या अल्बमसाठी सर्वोत्कृष्ट पॉप गायकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मे महिन्यात रिलीज झालेला हा अल्बम जगभरात गाजला होता. ‘सर्वोत्कृष्ट जागतिक संगीत‘ श्रेणीत सतारवादक पं. रविशंकर यांच्या कन्या अनुष्का शंकर यांना मात्र पुरस्काराने हुलकावणी दिली.
कोण कसे दिसले...
लॉस एंजिलिसमध्ये पार पडलेल्या 57व्या ग्रॅमी अवॉर्ड्सच्या रेड कार्पेटवर स्टार्स वेगवेगळ्या अंदाजात दिसले. विशेषतः आपल्या हटके ड्रेसिंग स्टाईलसाठी ओळखली जाणारी मडोना यावेळीसुद्धा हटकेच दिसली. मॉडेल आणि सिंगर जॉय विला रेड कार्पेटवर विचित्र ड्रेसमध्ये अवतरली होती. तिचा हा ड्रेस खूपच पारपदर्शक होता. तर निकी मिनाज ब्लॅक कलरच्या गाऊनमध्ये दिसली. अमेरिकन गायिका, गीतकार, फॅशन डिझायनर आणि अभिनेत्री असलेली ग्वेन स्टेफनी ब्लॅक कलरच्या आउटफिटमध्ये रेड कार्पेटवर अवतरली होती. सेक्सी पोजसाठी प्रसिद्ध असलेली टीव्ही स्टार किम कर्दाशियनने फ्रंट ओपन गाऊन परिधान केला होता. गायिका केटी पेरिची ड्रेस पारदर्शक होता. यावेळी सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते पेरिस हिल्टनने. सिल्व्हर कलरच्या गाऊनमध्ये ती खूपच सुंदर दिसली.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा रेड कार्पेटवर अवतरलेल्या तारकांचा खास अंदाज...