आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hollywood Actress Stopped Getting Work After Her True Age Was Revealed

खरे वय सांगितल्याने अभिनेत्रीला काम मिळणे बंद

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन- हॉलीवूडमध्ये अभिनेत्रीचे वय जाहीर झाल्यानंतर तिला चित्रपटात काम मिळणेच बंद झाल्याची शोकांतिका ओढवली आहे, परंतु न्यायालयाकडून हे प्रकरण फेटाळण्यात आले.

इंटरनेटवरील एका संकेतस्थळास जबाबदार धरण्याची या अभिनेत्रीची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. ज्युनिए होआंग असे अभिनेत्रीचे नाव आहे. 41 वर्षीय होआंगने 2011 मध्ये प्रदर्शित ‘जिंजरडेड मॅन-3 : सॅटर्डे नाईट क्लिव्हर’ चित्रपटात काम केले होते. चित्रपटविषयक वेबसाइटची सुरुवात 1990 मध्ये झाली होती. त्यात 1998 मध्ये अमेजनने खरेदी केले होते. होआंगच्या प्रोफाइलवर तिची जन्मतारीख जशासतशी ठेवण्यात आली आहे. 2011 मध्ये हा खटला कंपनीच्या विरूद्ध दाखल करण्यात आला होता. त्यात करार तोडने, फसवणूक, खासगी गोष्टींना जाहीर करणे, ग्राहक संरक्षण कायद्याचे उल्लंघनाचा आरोप आहे. संकेतस्थळाने वयावर आधारित भेदभावाचे प्रमाण वाढवले आहे, असा आरोप 2011 मध्ये दोन अभिनय संघटनांकडून करण्यात आला होता. अभिनेत्रीने नुकसान भरपाई म्हणून 10 लाख डॉलर्सचा खटला दाखल केला होता. वास्तविक या अभिनेत्रीने अगोदर आपले वय सात वर्षांनी कमी सांगितले होते. त्यानंतर संकेतस्थळाने तिच्या खर्‍या वयाचा शोध घेऊन तो आक्षेप असताना प्रकाशित केला.

पुरावा नाही
संकेतस्थळावरील माहितीवरून चित्रपटात काम करण्याचे प्रस्ताव येणे बंद झाल्याचे अभिनेत्री होआंग यांना कोर्टात सिद्ध करता आले नाही. त्यामुळे तिचा दावा न्यायालयाने अमान्य केला.

संकेतस्थळावर ठपका : चित्रपटात काम न मिळण्यास अमेजन डॉट कॉम हे इंटरनेट डाटाबेस संकेतस्थळ जबाबदार असल्याचा आरोप अभिनेत्री ज्युनिए होआंगने केला होता. मात्र न्यायालयाने होआंगचे म्हणणे मान्य केले नाही. आपले वय जाहीर केल्यामुळेच कामाचे प्रस्ताव येणे बंद झाल्याचा ठपका होआंगने कंपनीवर ठेवला आहे.

तो तर हक्कच
सेलिब्रिटीविषयी माहिती देताना त्यांच्या वयाची माहिती देणे, हा तर आपला हक्क आहे, अशी भूमिका अमेजन डॉट कॉमने न्यायालयात घेतली होती. अभिनेत्रीचे प्रोफाइल वाचून लोक काय निर्णय घेतील, याला आम्ही जबाबदार असण्याचे काहीच कारण नाही, असा युक्तिवाद कंपनीच्या वकिलांकडून करण्यात आला होता.