आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तब्बल 20 वर्षांनंतर 3D मध्ये रिलीज होणार आहे \'टायटॅनिक\'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


1997 साली रिलीज झालेला टायटॅनिक हा चित्रपट पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. तब्बल 20 वर्षांनंतर हा चित्रपट थ्रीडी आणि डॉल्बीमध्ये रिलीज होणार आहे. ‘कधीही न बुडणारे जहाज’ म्हणून ख्याती असणाऱ्या टायटॅनिक या विशाल जहाजाच्या जलसमाधीवर आधारित या चित्रपटाचे कथानक आहे. या जहाजबुडीच्या घटनेला याचवर्षी एप्रिल महिन्यात 105 वर्षे उलटून गेली आहेत. दिग्दर्शक जेम्स कॅमरुन यांनी टायटॅनिकचा हा पहिला आणि शेवटचा प्रवास प्रेक्षकांपर्यंत चित्रपटाच्या रुपातून पोहोचवला. (येथे बघा चित्रपटाचा ट्रेलर)

 

18 नोव्हेंबर रोजी 'टायटॅनिक'च्या रिलीजला 20 वर्षे पूर्ण...
18 नोव्हेंबर 1997 रोजी हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटातून प्रेमाची वेगळी परिभाषा मांडण्यात आली होती. किंबहुना आजही हा चित्रपट अनेकांच्याच फेव्हरेट लिस्टचा भाग आहे. असा हा ‘टायटॅनिक’ पुन्हा एकदा चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असून, या चित्रपटाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन नुकताच ‘टायटॅनिक’चा नवा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. ट्रेलरच्या सुरुवातीला दिग्दर्शक जेम्स कॅमरुन या चित्रपटाचा नव्या अंदाजात अनुभव घेण्याची प्रेक्षकांना विनंती करताना दिसत आहेत.

 

सुरुवातीला अमेरिकेत रिलीज होणार आहे चित्रपट...

1 डिसेंबरला पुन्हा प्रदर्शित होणारा हा चित्रपट सध्या अमेरिकेतच दाखवण्यात यणार आहे. पण, भारतातील प्रेक्षकांना या चित्रपटाचा आनंद ऑनलाइन घेता येणार आहे. अमेरिकेच्या ‘एएमआर थिएटर्स’मध्ये आठडाभरासाठी या चित्रपटाचे स्क्रीनिंग करण्यात येणार आहे. सध्या हा ट्रेलर सोशल मीडियावर बराच चर्चेत असून, जॅक आणि रोजच्या प्रेमकहाणीला प्रेक्षकांनी पुन्हा एकदा उजाळा दिला आहे. 

 

105 वर्षांपूर्वी अशी घडली होती जहाजबुडीची घटना...
15 एप्रिल 1912 रोजी टायटॅनिक समुद्रात बुडाले. ‘व्हाइट स्टार लाइन कंपनी’चे हे 52 हजार टन वजनाचे जहाज 10 एप्रिलला इंग्लंडमधील साऊथ हॅप्टनमधून न्यूयॉर्कच्या दिशेने निघाले होते. ही त्या जहाजाची पहिलीच सफर होती. पण 14 एप्रिलला रात्री 11 वाजून 40 मिनिटांनी उत्तर अटलांटिक महासागरातील प्रवासादरम्यान विशाल हिमनगावर ते आदळले आणि त्यानंतर अवघ्या 2 तास 40 मिनिटांत हजारो प्रवाशांना पोटात घेऊन ‘टायटॅनिक’ने जलसमाधी घेतली होती.

 

चित्रपटाने पटकावले होते 11 ऑस्कर अवॉर्ड्स..
या घटनेवर आधारित टायटॅनिक या चित्रपटाचा निर्मिती खर्च 1360 कोटी इतका होता, तर सिनेमाने 14 हजार कोटींचा बिझनेस केला होता. तब्बल 11 ऑस्कर अवॉर्ड्स या चित्रपटाने आपल्या नावी केले होते.  

 

पुढील स्लाईड्सवर बघा, 1997 साली रिलीज झालेल्या 'टायटॅनिक' या चित्रपटाचे  निवडक ऑन लोकेशन Photos...

बातम्या आणखी आहेत...