आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hollywood Icon Marilyn Monroe’s Final Photoshoot Images To Be Auctioned In Texas

हॉट अॅक्ट्रेस मर्लिन मुनरोच्या शेवटच्या सेक्सी PHOTOSचा होणार लिलाव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(मर्लिनच्या शेवटच्या फोटोशूटची छायाचित्रे)

लंडनः हॉलिवूडची आयकॉन मर्लिन मुनरोच्या अखेरच्या छायाचित्रांचा लिलाव पुढील आठवड्यात टॅक्ससमध्ये होणार आहे. व्होगसाठी बर्ट स्टर्न यांनी 1962मध्ये काढलेली मर्निलची ही छायाचित्रे टॅक्ससमध्ये होणा-या हॅरिटेज ऑक्शनमध्ये लिलावासाठी ठेवली जाणार आहेत. स्टर्न यांचे 2013मध्ये निधन झाले.
व्होग या मॅगझिनसाठी बर्ट स्टर्न यांनी 1962 मध्ये मर्लिनची खास अदा आपल्या कॅमे-यात कैद केली होती. ही मर्लिनची शेवटची छायाचित्रे ठरली. वयाच्या 36व्या वर्षी मर्लिनचे निधन झाले. तिच्या या छायाचित्रांना 'द लास्ट सिटिंग' या नावाने ओळखले जाते.
टॅक्ससमध्ये होणा-या लिलावात मर्लिनचे मित्र जॉर्ज बॅरिस यांनी क्लिक केलेल्या छायाचित्रांचाही समावेश असणार आहे. 1955मध्ये त्यांनी 'द सेवन ईयर इच' या सिनेमाच्या शूटिंगवेळी त्यांनी मर्लिनची ही छायाचित्रे क्लिक केली होती. या छायाचित्रांमध्ये मुनरो कॅलिफोर्नियाच्या बीजवर दिसत आहे. बॅरिस यांनी मर्लिनची ही छायाचित्रे तिच्यावर तयार होणा-या एका पुस्तकासाठी गोळा केली होती. मात्र तीन आठवड्यांतच त्यांचे निधन झाले. त्यामुळे हे पुस्तक आकारास येऊ शकले नाही.
तज्ज्ञांच्या मते, लिलावात प्रत्येक प्रिंटसाठी चार हजार पाऊंडची बोली लागण्याची शक्यता आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा फोटोशूटमधील मर्लिनची तिच्या चाहत्यांना आजही भूरळ घालणारी दिलखेचक अदा...