आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिटनीची बहिण 16 व्या वर्षीच बनली होती आई; टेलरने केले 7 पुरुषांबरोबर 8 वेळा लग्न

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय युवक-युवतीच्या मनावर राज्य गाजविणा-या 47 वर्षीय सलमान खानला कमी वयात लग्न करण्याची क्रेझ भलेही नसेल. पण हॉलिवूडमधील सितारे यांच्यामध्ये लहान वयात लग्न करणे हे करिअरपेक्षा जास्त महत्त्वाचे मानले जात असल्याचे दिसून येते. हॉलिवूडमधील फिल्म इंडस्ट्रीतील बहुचर्चित एका डझनपेक्षा जास्त कलाकरांनी 20 वर्षाच्या वयाच्या आतच लग्न करुन मोकळे झाले आहेत. एवढेच नव्हे तर हे कलाकर एक-दोन मुलांचे आई-बाप बनले आहेत. आम्ही तुम्हाला हॉलिवूडमधील अशा 11 प्रसिद्ध हस्तियांविषयी सांगणार आहोत ज्यांनी वयाच्या 20 च्या आतच रू-ब-रू करीत लग्न करुन टाकले आहे.

हॉलिवूडमधील एक हस्ती जॅमी लिन स्पिअर्स, जिने नुकतेच बॉस्केटबॉल खेळाडू जिमी वाटसनशी लग्न करण्याची घोषणा केली. या अमेरिकन अभिनेत्रीची हे दुसरे लग्न असेल. चार वर्षाची मुलगी मॅडीची आई असलेली जॅमी लिन स्पियर्स गेल्या तीन वर्षापासून जिमीसोबत डेटिंग करीत आहे. याआधीही ती आपले वय, अफेअर, डेटिंग आणि लग्न यामुळे मीडियाच्या चर्चेत राहिली आहे.

रिकॉर्डिंग आर्टिस्ट ब्रिटनी स्पिअर्सची लहान बहिण असलेली जॅमी फक्त 21 वर्षाची आहे. मात्र तिच्या लग्नाचे किस्से वयाच्या 14 व्या वर्षापासूनच चर्चेले जावू लागले होते. त्यावेळी ती आपला बॉयफ्रेंड कासे एल्ड्रीजसोबत डेटिंग करीत होती. दोन वर्षे कासेसोबत डेटिंग केल्यानंतर डिसेंबर, 2007 मध्ये तिने 'ओके' नियतकालिकेला दिलेल्या मुलाखतीत आपण गर्भवती असल्याचे सांगितले होते.

तिच्या या घोषणेनंतर अमेरिकेत एक वाद सुरु झाला होता. त्यावेळी जॅमी 16 वर्षांची तर कासे एल्ड्रीज 18 वर्षांचा होता. मार्च, 2008 मध्ये तिने आपले लग्न झाल्याला दुजोरा दिला. मे महिन्यात जॅमी आणि एल्ड्रीज मिसीसिप्पी स्थित लिबर्टी येथे गेले व तेथे एक घर खरेदी केले.

जून, 2008 मध्ये जॅमीने एका मुलीला जन्म दिला. जिचे नाव मॅडी ब्रायन एल्ड्रीज ठेवले गेले. मार्च, 2009 मध्ये जॅमी स्पिअर्स आणि एल्ड्रीज यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. मात्र, पुन्हा ऑगस्ट, 2010 पासून ते पुन्हा एकदा एकत्र राहू लागले. परंतु ते फार काळ एकत्र राहू शकले नाहीत. चारच महिन्यात म्हणजे नोव्हेंबरमध्ये ते परत वेगळे झाले. तेव्हापासून ती बॉस्केटबॉलपटू जिमी वाटसनशी डेट करीत होती. याबाबत बातम्या येत होत्या. आता मात्र तिने यावरुन पडदा उठवत आपण त्याच्याशी लवकरच लग्न करण्याची घोषणा केली आहे.


एलिझाबेथ टेलरने 7 पुरुषांबरोबर 8 वेळा केले होते लग्न, वाचण्यासाठी पुढे क्लिक करा...