(हॅलो मॅगझिनच्या कव्हरपेजवर प्रकाशित झालेले अँजेलिना जोली आणि ब्रॅड पिटच्या लग्नाचे छायाचित्र)
23 ऑगस्ट रोजी फ्रान्समध्ये लग्नगाठीत अडकलेले हॉलिवूडचे स्टार कपल अँजेलिना जोली आणि ब्रॅड पिट यांच्या लग्नाचे छायाचित्र हॅलो मॅगझिनच्या कव्हरपेजवर प्रकाशित झाले आहे. हॉलिवूडमध्ये ब्रँजेलिना या नावाने प्रसिद्ध असलेल्या या कपलने
आपल्या लग्नाची छायाचित्रे दोन मॅगझिन्सला तब्बल 30 कोटी 22 लाखांमध्ये विकली आहेत. या कपलला हॅलो आणि पीपुल मॅगझिनने संयुक्तरित्या रक्कम दिली आहे. ही रक्कम या कपने चॅरिटीसाठी दिली आहे.
हॉलिवूडमध्ये लग्नाची आणि विशेषतः मुलांची छायाचित्रे मीडिया हाऊसला विकणे ही तशी पाहता सामान्य बाब आहे. नऊ वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिलेल्या आणि बँजेलिना नावाने प्रसिद्ध असलेल्या या कपलने फ्रान्समध्ये गुपचुप पद्धतीने लग्न थाटले होते. या लग्नात जवळच्या कुटुंबीयांसोबत त्यांची सहा मुले उपस्थित होती.
बातम्यांनुसार, हे दोघे गोंजो येथील माल्टा आयलँडवर हनीमून साजरा करत आहे. येथे त्यांच्यासोबत त्यांची सहाही मुले हजर आहेत. हे आयलँड रिकामे करुन घेण्यासाठी या कपलने स्थानिक लोकांना एक कोटी रुपये दिले आहेत.
पुढील स्लाईड्समधून जाणून घ्या यापूर्वी हॉलिवूडच्या कोणत्या कपल्सनी आपल्या लग्नाच्या छायाचित्रांची विक्री केली होती.