आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • I Telugu Version Will Launch By Actor Jackie Chan & Sylvester Stallone

\'I\'च्या तेलगू आणि हिंदी व्हर्जन लाँचला जॅकी चॅन आणि सिल्व्हेस्टर स्टेलॉन लावणार हजेरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हॉलिवूड अभिनेते सिल्व्हेस्टर स्टेलॉन आणि जॅकी चॅन दाक्षिणात्य सुपरस्टार विक्रमची प्रमुख भूमिका असलेल्या आय या सिनेमाच्या तेलगु आणि हिंदी व्हर्जन लाँचला हजेरी लावणार असल्याचे वृत्त आहे. या कार्यक्रमाला अभिनेते चिरंजीवी यांचीही उपस्थिती राहणार आहे.
शंकर दिग्दर्शित आय हा एक रोमँटिक थ्रिलर सिनेमा आहे. ए. आर. रहमान यांनी या सिनेमाला म्युझिक दिले आहे. तसेच आस्कर रविचंद्रन यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे.
जॅकी चॅन यांनी यापूर्वी कमल हासन अभिनीत आणि आस्कर रविचंद्रन निर्मित 'दशावतार' सिनेमाच्या म्युझिक लाँचला उपस्थिती लावली होती.
काही दिवसांपूर्वी चेन्नईत आय या सिनेमाचे म्युझिक लाँच करण्यात आले होते. या सोहळ्याला 'टर्मिनेटर' या हॉलिवूड सिनेमातून भारतात प्रसिध्द झालेला अभिनेता आर्नोल्ड श्वार्जनेगरची विशेष उपस्थिती होती. येत्या 25 डिसेंबरला हा सिनेमा रिलीज होणार आहे.