आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाकू खरेदी करताना जुळले प्रेम, 62 वर्षांच्या म्हाताऱ्याने केले 18 वर्षाच्या तरुणीशी लग्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रेमाला वयाचे बंधन नसते, असे म्हटले जाते. हे अगदी खरे असावे असे वाटते, कारण अनेकदा त्याचा प्रत्यय आलेला आहे. याच म्हणीचा प्रत्यय देणारी आणखी एक घटना नुकतीच समोर आली आहे. इंडोनेशियाचे राहणारे 62 वर्षांचे सुलेमान दाएंग नगम्पा (Sulaeman Daeng Ngampa ) यांनी त्यांच्यापेक्षा 44 वर्षांनी लहान असलेल्या मुलीबरोबर लग्न केले आहे. 
 
5 मुलांचे वडिल आहेत सुलेमान...
Gowa चे राहणारे सुलेमान आणि 18 वर्षांची डायना डाएंग नगनियांग (Diana Daeng Nganiyang) यांची लव्ह स्टोरी सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. त्याचे कारण म्हणजे त्यांच्या वयात 44 वर्षांचे अंतर आहे. एका वेबसाईटवरील माहितीनुसार सुलेमान पाच मुलांचे पिता आहेत आणि त्यांना 9 नातू आहेत. काही वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाल्याने ते एकटे पडले. सुमारे वर्षभरापूर्वी सुलेमान यांची डायनाबरोबर भेट झाली होती. त्यानंतर दोघांचे प्रेम जुळले. 16 जुलैला सुलेमानने त्यांच्या मुलांच्या उपस्थितीत डायनाबरोबर लग्न केले आहे. 

चाकू खरेदी करायला जायचे डायनाच्या घरी.. 
वृत्तानुसार, डायनाचे वडील लोहार आहेत. सुलेमान त्यांच्या पत्नीच्या मृत्यूनंतर नेहमी तिच्या घरी काहीतरी खरेदीसाठी जायचे. डायना नेहमी त्यांच्यासाठी कॉफी तयार करायची. डायनाचे कौतुक करताना सुलेमान सांगतो की, ती फार सुंदर आणि चांगली मुलगी आहे. हळू-हळू सुलेमान डायनावर एवढा प्रभावित झाला की, त्याचे तिच्यावर प्रेम जडले. सुमारे एका वर्षांनी त्यांनी डायनाला लग्नासाठी प्रपोज केले. डायना लग्नासाठी तयार होती, पण वयातील अंतरामुळे लोक विरोध करायला लागले. पण हा विरोध फार दिवस चालला नाही. डायना म्हणजे, मला सुलेमान यांचे व्यक्तीमत्त्व फारच आवडले. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, डायना आणि सुलेमान यांचे काही Photos...
बातम्या आणखी आहेत...