आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Despite Being Bitten By Cobra, Pop Star Irma Bule Keeps Singing For 45 Mins; Dies Onstage

कोब्रा गळ्यात घेऊन नाचणे जिवावर बेतले, प्रसिद्ध पॉप स्टारचा स्‍टेजवरच मृत्‍यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कारावाग (इंडोनेशिया) - येथील प्रसिद्ध पॉप स्‍टार इरमा बुले (29) ही विषारी सापाला गळ्यात टाकून लाइव्‍ह परफॉर्मेंस करत होती. पण, चापाने तिला चावा घेतल्‍याने स्‍टेजवरच तिचा मृत्‍यू झाला. ही घटना गुरुवारी कारावाग येथे घडली.
स्‍टंट आणि गायन सोबतच
इरमा बुले ही इंडोनेशियातील प्रसिद्ध गायिका होती. इंडोनेशियन लोक संगीतातील विधा डंगडुट सर्किल्‍समध्‍ये ती पारंगत होती. स्‍टेज शो करताना ती स्‍टंटसुद्धा करत असे. त्‍यामुळे ती विशेष लोकप्रिय होती.
यापूर्वीही साप आणि अरगराला घेऊन केले शो
इरमा बुले हिने यापूर्वीसुद्धा अनेक वेळा साप आणि अजगराला घेऊन अनेक‍ स्‍टेज शो केले होते. त्‍यामुळे कारावाग येथे साप घेऊन कार्यक्रम करायला तिला परवानगी देण्‍यात आली.
घेतला नव्‍हता अॅण्‍टी डोज
शो करण्‍यापूर्वी तिने अॅण्‍टी डोज घ्‍यावा, असे आयोजकांनी तिला सूचवले होते. परंतु, तिने नकार दिला.
45 मिनिटांनी खाली कोसळली
शो करताना इरमा बुले 45 मिनिटांनी स्‍टेज वरच कोसळली. पहिल्‍यांदा तिने ओकारी केली. नंतर ती बेशुद्ध झाली. त्‍यावर तिला रुग्‍णालयात भरती करण्‍यात आले. पण, डॉक्‍टरांनी तिला मृत घोषित केले.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, संबंधित फोटोज...