आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'टायटॅनिक\'ची 20 वर्षे : 204 कोटीत तयार झाला होता सेट, हे 9 मुव्ही सेट आहेत सर्वाधिक महागडे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः ब्लॉकबस्टर 'टायटॅनिक' या सिनेमाच्या रिलीजला नुकतीच 20 वर्षे पूर्ण झाली आहेत. 18 नोव्हेंबर 1977 रोजी हा सिनेमा रिलीज झाला होता. जगभरात हॉलिवूड आणि बॉलिवूड सिनेमे बघितले जातात. मात्र बॉलिवूडच्या तुलनेत हॉलिवूड सिनेमांवर सर्वाधिक खर्च होताना दिसतो. हॉलिवूडच्या इतिहासात असे अनेक सिनेमे आहेत, ज्यांच्या सेटच्या निर्मितीवर कोट्यवधी रुपयांचा खर्च झाला. हॉलिवूडच्या एका सेटच्या खर्चात बॉलिवूडमध्ये 2-3 सिनेमे तयार होऊ शकतात. सर्वाधिक महागड्या सेटचा उल्लेख झाल्यास, टायटॅनिकपासून ते द लॉर्ड ऑफ रिंग्स आणि वॉटरवर्ल्ड या सिनेमांच्या सेटच्या निर्मितीवर सर्वाधिक पैसा खर्च झाला आहे. आज या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला अशा 10 हॉलिवूड सिनेमांविषयीची माहिती देतोय, ज्यांच्या सेटच्या निर्मितीवर पाण्यासारखा पैसा खर्च झाला आहे.


टायटॅनिक (Titanic) - 1997 
सिनेमाचा एकुण निर्मिती खर्च - 1360 कोटी रुपये 
सेटच्या निर्मितीसाठी लागलेला पैसा - 204 कोटी रुपये

प्रोड्यूसर-डायरेक्टर जेम्स कॅमरन यांच्या या सिनेमाने एक दोन नव्हे तर तब्बल 11 ऑस्कर अवॉर्ड आपल्या नावी केले होते. या सिनेमात आरएमएस टायटॅनिक जहाजाची दुर्घटना चित्रीत झाली होती. सिनेमात समुद्राचा सेट तयार करण्यासाठी तब्ल 40 एकरात दोन मोठे पाण्याचे टँक तयार करण्यात आले होते. हे टँक बनवण्यासाठी 20 मिलियन (2 कोटी) गॅलन पाणी भरण्यात आले होते. या सिनेमाच्या चित्रीकरणाला ठराविक वेळेपेक्षा दोन महिन्यांचा अधीकचा कालावधी लागला होता. सेटवर काम करणा-या सर्व वर्कर्सना 2 महिन्यांचा ओवरटाइम देण्यात आला होता. या सिनेमाच्या एकुण निर्मिती खर्चापैकी एक मोठा भाग हा केवळ सेटच्या निर्मितीवर खर्च करण्यात आला होता. या सेटवर टायटॅनिक जहाजबुडीचे चित्रीकरण करण्यात आले होते. आजच्या काळाच्या हिशोबानुसार या सेटवर तब्बल 204 कोटी रुपये खर्च झाले होते.

 

पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या अशा आणखी 9 सिनेमांविषयी ज्यांचे मुव्ही सेट होते सर्वाधिक महागडे...

बातम्या आणखी आहेत...